जिगरबाज कामगिरी! सुरक्षा दलांनी एकाच आठवड्यात १६ दहशतवाद्यांचा केला खात्मा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत त्यांचा खात्मा करण्याचा धडाकाच भारतीय सैन्याकडून सुरु आहे. सुरक्षा दलाकडून शनिवारी कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात शुक्रवार रात्रीपासून चकमक सुरु होती. या चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेली ही ४थी चकमक आहे. याआधी शोपियाँ जिल्ह्यात ३ वेगवेगळ्या चकमकींमध्ये हिज्बुलच्या काही प्रमुख कमांडरांसह १४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. त्यामुळे या एकाच आठवड्यात १६ दहशतवाद्यांचा भारतीय सुरक्षा दलांनी खात्मा करण्याची जिगरबाज कामगिरी केली आहे.

यावर्षी सुरक्षा दलाकडून मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा जवळपास ९५ वर गेला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, देशभरात लागू असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच जवळपास १ एप्रिल ते १० जूनपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विविध चकमक आणि कारवायांमध्ये सुरक्षा दलाकडून जवळपास ६८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment