Jammu Kashmir : जम्मू काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हंटले जाते. हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात. आता याच पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून श्रीनगर (Jammu Kashmir) जवळ गेस्ट हाऊस बांधण्यात येणार आहे. काल(१३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जवळ असणाऱ्या बडगाम जिल्ह्यातील (Jammu Kashmir) इच्चगाम तालुक्यात हे गेस्ट हाऊस बांधले जाणार आहे. यासाठी २.५ एकर जमीन संपादित करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांना आरामदायी आणि परवडणारी निवासी सोय उपलब्ध व्हावी हा यामागचा उद्देश आहे. जम्मु आणि काश्मिरमध्ये रु.८.१६ कोटी रकमेचा क्र.५७६ मधील २० कनाल क्षेत्रफळ (२.५० एकर) भूखंड महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही अर्थमंत्रालय आहे, त्यांनी यापूर्वी श्रीनगर (Jammu Kashmir) आणि अयोध्येत महाराष्ट्र भवने बांधण्याची घोषणा केली होती. राज्याच्या अर्थसंकल्पात एकत्रित केलेल्या या हालचालीमुळे पर्यटक आणि भाविकांना वाजवी दरात आरामदायी आणि सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध होईल.
रामजन्मभूमी येथेही महाराष्ट्र भवन (Jammu Kashmir)
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की , “राज्यातील पर्यटक आणि भाविकांना माफक दरात उत्तम आणि सुरक्षित सुविधा देण्यासाठी श्रीनगर, जम्मू-काश्मीर आणि श्री रामजन्मभूमी, अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी संबंधित राज्य सरकारांनी मुख्य ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली आहे ज्यासाठी रु. 77 कोटींचा प्रस्ताव आहे,” असे पवार म्हणाले.