Paytm Fastag Deadline : Paytm फास्टॅग युजर्ससाठी महत्वाची बातमी; 15 मार्चपर्यंत करा हे’ काम अन्यथा होईल नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Paytm Fastag Deadline) जर तुम्ही Paytm युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ज्या लोकांनी आपल्या गाड्यांवर पेटीएमचा फास्टॅग इन्स्टॉल केला आहे त्यांचा फास्टॅग उद्यानंतर निष्क्रिय केला जाऊ शकतो. याचे कारण असे की, Paytm पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. यानुसार १५ मार्चपर्यंतचा अवधी प्रदान केला गेला होता.

त्यामुळे पेटीएम फास्टॅग युजर्स १५ मार्चनंतर म्हणजेच उद्यापासून त्यांचा फास्टॅग रिचार्ज करू शकणार नाहीत. म्हणूनच राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना टोल प्लाझावर दुप्पट टोल वा दंड भरायला लागू नये म्हणून पेटीएम फास्टॅग युजर्सने इतर कोणत्याही बँकेतून फास्टॅग काढणे गरजेचे आहे. (Paytm Fastag Deadline)

NHAI चा सल्ला

NHAI ने पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना टोल प्लाझावर कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी १५ मार्च २०२४ पूर्वी इतर कोणत्याही बँकेतून फास्टॅग खरेदी करावा, असा महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. दरम्यान NHAI ने सांगितले की, ‘मुदत संपण्याआधी जे ग्राहक अन्य बँकेतून फास्टॅग घेणार नाहीत, त्यांना राष्ट्रीय महामार्गावर प्रवासादरम्यान दंड किंवा दुप्पट शुल्क भरावे लागेल.

(Paytm Fastag Deadline) जर तुम्हीसुद्धा पेटीएम फास्टॅग युजर असाल आणि अजूनही त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला नव्या फास्टॅगची गरज आहे. आम्ही तुम्हाला NHAI नोंदणीकृत फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांची संपूर्ण यादी देत आहोत. ज्यामुळे तुम्ही यांपैकी कोणत्याही बँकेच्या माध्यमातून नवा फास्टॅग खरेदी करू शकता.

उद्यानंतर फास्टॅग रिचार्ज आणि टॉप- अप होणार नाही (Paytm Fastag Deadline)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm पेमेंट्स बँकेवर घातलेले निर्बंध आणि त्यावरील मार्गदर्शक तत्त्वांचे ग्राहकांनी पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १५ मार्च २०२४ पर्यंत वेळ दिला होता. (Paytm Fastag Deadline) मात्र आता यानंतर रिचार्ज किंवा त्याची शिल्लक टॉप- अप करण्याचा पर्याय उपलब्ध नसेल, हे लक्षात घ्या. तथापि, ते शिल्लक वापरणे सुरू ठेवू शकतात. यासाठी NHAI ने पेटीएम फास्टॅग युजर्सला त्यांच्या संबंधित बँकांशी संपर्क साधावा असे सांगितले आहे.

NHAI नोंदणीकृत फास्टॅग जारी करणाऱ्या बँका

  • भारतीय स्टेट बँक – https://fastag.onlinesbi.com/Home
  • येस बँक – https://www.yesbank.in/digital-banking/fastag
  • यूनियन बँक ऑफ इंडिया – https://www.unionbankofindia.co.in/english/netc-issuer.aspx
  • PNB बँक – https://www.pnbindia.in/PNB-Netc.html
  • सारस्वत सहकारी बँक – https://www.saraswatbank.com/content.aspx?id=National-Electronic- Toll-Collection-NETC
  • ICICI बँक – https://nli.icicibank.com/NewRetailWeb/fast TagHomePage.htm? channelCode=imb_sales
  • IDBI बँक – https://www.idbibank.in/fastag.aspx
  • IDFC फर्स्ट बँक – https://www.idfcbank.com/fastag.html
  • इंडसइंड बँक – https://fastag.indusind.com/Account/CreateNewUser? NeutralTag=0#cbs_step-
  • ॲक्सिस बँक – https://fastag.axisbank.co.in/CEBAWEB/Default.aspx
  • अलाहाबाद बँक – https://fastagpro.com/allahada-bank-fastag-recharge
  • बँक ऑफ बडोदा – https://fastag.bankofbaroda.com/Pages/CreateAccount/CreateAccount.aspx
  • बँक ऑफ महाराष्ट्र – https://www.bankofmaharashtra.in/netc-fastag
  • कॅनरा बँक – https://canarites.canarabankdigi.in/Fastag/
  • सिटी युनियन बँक – https://www.cityunionbank.com/cub-fastag
  • इक्विटास स्मॉल फायनान्स बँक – https://www.equitasbank.com/fastag
  • कॉसमॉस बँक – https://www.cosmosbank.com/product-services-details.aspx?id=19
  • कोटक महिंद्रा बँक – https://kotakfastag.in/
  • एचडीएफसी बँक – https://apply.hdfcbank.com/digital/fastag
  • इंडियन बँक – https://www.Indianbank.in/departments/netc-fastag/
  • एअरटेल पेमेंट्स बँक – https://www.airtel.in/bank/fastag-pay-toll-online/buy
  • एयू स्मॉल फायनान्स बँक – https://www.aubank.in/personal-banking/digital-banking/payment/fastag
  • DNS बँक – https://www.dnsbank.in/Encyc/2021/6/7/DNS-Fastag-for-toll-plaza.html
  • फेडरल बँक – https://netcfastag.federalbank.co.in/
  • फिनो पेमेंट्स बँक – https://www.finobank.com/personal/products/fastag/
  • इंडियन ओवरसीज बँक – https://iobfastag.gitechnology.in/
  • जम्मू आणि काश्मीर बँक – https://www.jkbank.com/transactions/services/fastag.php
  • कर्नाटक बँक – https://karnatakabank.com/personl/national-electronic-toll-collection
  • नागपुर नागरिक सहकारी बँक – https://www.nnsbank.co.in/netcfaq.php
  • पंजाब महाराष्ट्र बँक – https://fastagpro.com/punjab-maharashtra-cooperative-bank-fastag-recharge
  • साउथ इंडियन बँक – https://fastag.south Indianbank.com/NETCPortal/getCustOnboard
  • सिंडिकेट बँक – https://fastagpro.com/syndicate-bank-fastag-recharge
  • जळगाव पीपल्स को. ऑपरेटिव्ह बँक – https://www.jpcbank.com/netc-fastag
  • यूको बँक – https://www.ucobank.com/web/guest/netc-fastag