Bank FD : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 9% पर्यंत व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता Jana Small Finance Bank चे नाव देखील सामील झाले आहे.

Jana Small Finance Bank digitally inaugurates 18 branches in Maharashtra -  The SME Times

1 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

Jana Small Finance Bank चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. 1 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. या बदलानंतर, बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर सर्वसामान्यांना 3.75% ते 6.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 4.45% ते 6.70% पर्यंत व्याज देत आहे. तसेच बँक आता 2 वर्षे ते 3 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 8.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.80% रिटर्न देईल. Bank FD

Jana Small Finance Bank in Shahdara - Best Banks in Delhi - Justdial

Jana Small Finance Bank च्या एफडीचे दर

सध्या बँकेकडून 7-14 दिवसांच्या FD वर 3.75% तर 15-60 दिवसांच्या FD वर 4.25% व्याजदर देत आहे. त्याच प्रमाणे बँक 61 ते 90 दिवसांच्या FD वर 5.25%, 91 ते 180 दिवसांच्या FD वर 5.50%, 181-364 दिवसांच्या FD वर 7.00%, 1 वर्ष [365 दिवस] मुदतीच्या FD वर 7.25% दराने व्याज देईल. तसेच बँक आता 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर 7.50%, 2 वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर 8.10%, 3 ते 5 वर्षांच्या FD वर 7.35%, 5 वर्षे (1825 दिवस) कालावधीच्या FD वर 7.25%, 5-10 वर्षाच्या FD वर 6.00% पर्यंत व्याजदर देत आहे. Bank FD

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Bank FD

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank FD

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.janabank.com/deposits/regular-fixed-deposit/

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर