जनशक्ती व लोकशाही आघाडीने ठरवून सभेमध्ये दंगा केला ः नगराध्यांक्षा रोहिणी शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपरिषदेची बुधवारी (दि.७) विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी सभेला केलेला विरोध कायदेशीरदृष्ट्या चुकीचा होता. जोपर्यंत पूर्वी झालेले मिटींगचे प्रोसिडिंग लिहून पूर्ण होत नाही. तोपर्यंत सर्वसाधारण (जनरल) सभा घेता येत नाही. दिनांक 19 जानेवारी२०२१  रोजी मागील सभा पार पडली. सदर सभा 148 विषयाची होती, यापैकी 106 ठरावच माझ्या साहिला आले आहेत. राहिलेल्या ठरावांसाठी मी वेळोवेळी मिटींग क्लार्क यांना लेखी व तोंडी सूचना केल्या आहेत. पत्रही दिले आहेत, पण आजतागायत राहिलेले ठराव माझ्या सहीसाठी आलेले नाहीत. त्यामुळेच मी विशेष सभा काढली. परंतु जनशक्ती व  लोकशाही आघाडी यांनी ठरवून या ऑनलाईन सभेमध्ये दंगा करून  विघ्न आणायचे हे आधीच ठरवले होते असा आरोप नगराध्यांक्षा रोहिणी शिंदे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, जनशक्ती व  लोकशाही आघाडी यांनी ठरवून या ऑनलाईन सभेमध्ये दंगा करून  विघ्न आणायचे हे आधीच ठरवले होते. त्यामुळे हे दोन्ही गट सभा ऑनलाइन काढली  असतानासुद्धा शासनाच्या कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवून नगरपरिषद मीटिंग हॉलमध्ये मोठ्या स्क्रीन लावून बसले होते. मिटिंगची विषय पत्रिका निघून बरेच दिवस होऊन सुद्धा सदर कालावधीत या विशेष सभेबद्दल कोणीही हरकत घेतली नाही. परंतु गेल्या काही सभामध्ये फक्त गोंधळ घालून सभा चालूच द्यायच्या नाहीत, असे धोरण यांनी ठरवले होते.  त्यामुळेच आम्ही सदर मिटिंग रद्द करण्यास होकार दिला. जर होकार दिला नसता तर पुन्हा नेहमीप्रमाणे सभा होऊ दयायचीच नाही, हे ठरवूनच ते सर्वजण मिटींगला आले होते. या विशेष सभेमध्ये आम्ही गावच्या विकासाचे तसेच नगर परिषद कर्मचारी यांचे महत्त्वाचे विषय घेतले होते. पण या दोन्ही आघाड्यांना गावच्या  विकासापेक्षा स्वतःचा अहंपणा महत्त्वाचा वाटतो. पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काहीतरी करतोय, हे दाखवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण यामुळे गावच्या विकासाची कामे ठप्प होत आहेत, हे त्यांच्या लक्षात येत नाही. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 मधील पान 244 मधील कलम 81 कायदा 1(अ)  चा क्रमांक 2  (खंड १) अनुसार नगराध्यक्षांना विशेष सभा बोलण्याचा अधिकार आहे हे नमूद आहे. श्री. वाटेगावकर यांनी कायदा संपूर्ण वाचावा अर्धवट वाचून चुकीची माहिती सभागृहाला देऊ नये.

 कोरोना संदर्भात नगरसेविका हुलवान यांनी मांडलेल्या मुद्द्यावर आम्ही गेली पंधरा दिवस ग्राउंड लेव्हल वर काम करीत आहोत. मात्र त्या व त्यांचे सहकारी मागच्या कोरोनाच्या वेळी व यावेळी सुद्धा कोठे आहेत, त्यांचे म्हणणे आहे की मी फोटो काढत असते. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही प्रत्यक्ष काम केल्याशिवाय प्रत्येक ठिकाणी पोहोचले शिवाय फोटो काढता येतील का? नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी यांच्याशी ज्येष्ठ नगरसेवक पावसकर आण्णा यांनी चर्चा करून सोमवार पेठेमध्ये लसीकरण केंद्राची मागणी करून सदर केंद्र चालू केली. मी स्वतः शनिवार पेठ मध्ये लसीकरण केंद्राची मागणी करून पत्रकार भवन येथे लसीकरण केंद्र चालू करून घेतले आहे. याशिवाय नागरी आरोग्य केंद्र येथे सुरु असलेल्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व साधनसामुग्री तेथे पोहोच होऊन लसीकरण प्रत्यक्ष सुरळीत सुरु होई पर्यंत सलग ३ दिवस मी त्या ठिकाणी थांबून होते. या प्रक्रियेत आपण कुठे होता याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

कालची सभा ही कोणाच्याही दबावाखाली रद्द केली, नसून सभेमध्ये काही कारण नसताना काही जणांच्या विनाकारण गोंधळामुळे शहरात सदस्यांच्या बाबतीत चुकीची व नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे ,हे होऊ नये यासाठी ही सभा रद्द केली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment