कोविड रुग्णांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन द्या : जिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराच्या सुविधांची पाहणी घाटी रुग्णालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केली. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या कोरोना वार्ड क्रमांक-4 या ऑक्सिजन व्हेंटिलेटरसह बेडची अतिरिक्त सुविधा उपलब्धेसाठी तयार करण्यात येत असलेल्या वार्डाची पाहणी करतेवेळी जिल्हाधिका-यांनी घाटी रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणांना सूचना दिल्या.

यावेळी अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. वर्षा रोठे यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते. कोरोनावर उपचार घेत असताना सर्व रुग्णांना वेळेवर बेड आणि ऑक्सिजन त्याचप्रमाणे आवश्यक ती औषधे वेळेत उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी उपस्थित आरोग्य यंत्रणेला दिले.

यावेळी पाहणी करताना ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, स्वच्छतागृहे, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ याबाबत आढावा घेतला. यानंतर डॉ. वर्षा रोठे यांच्यासह वॉर्ड क्रमांक 5 च्या औषधशास्त्र विभागाच्या वॉर्डात असलेल्या सुविधेचा आढाव्यासह पाहणी केली. कोरोना प्रार्दूभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याची खबरदारी आरोग्य यंत्रणेने घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी घाटी येथील विशेष 45 बेडच्या कोरोना उपचारार्थ तयार करण्यात येत असलेल्या वार्डाच्या तयारी बाबत पाहणी करताना केली.

Leave a Comment