धडक नंतर जान्हवी आणि ईशानला काम नाही

Thumbnail 1532940635200
Thumbnail 1532940635200
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | धडक चित्रपटाने आजतागायत ६० कोटीहून अधिक कमाई केल्याने चित्रपट तेजीत आहे. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांना आगामी काळात काम नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नजीकच्या काळात दिलेल्या मुलाखतीत आता पुढील प्रोजेक्ट काय आहेत असे विचारल्यावर जान्हवी म्हणाली की, दिग्दर्शकसोबत बोलणी सुरू आहेत. आगामी चित्रपटाची क्रिप्ट तयार होते आहे अशी उत्तरे देऊन तुम्हाला मी खेळवून ठेवणार नाही. तर ईशानने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही असे म्हणून त्याने या प्रश्नावरून काढता पाय घेतला.
जान्हवी आणि ईशान ने दिलेल्या उत्तरावरून त्यांना आगामी काळात कोणताच चित्रपट नसल्याचे लक्षात येते. तसे पहायला गेले तर जान्हवी कपूरचा धडक चित्रपटातील अभिनय तितकासा चांगला नाही. कारण जान्हवीला संवाद फेक सुद्धा नीट करता आली नाही.