कराडचा दोन दिवसांचा जनता कर्फ्यू सीओंवरच उलटला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी  सकलेन मुलाणी

वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता दीड लाख लोकसंख्या असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड शहरात 48 तासांचा कर्फ्यू जाहीर करून मुख्य अधिकारी यशवंत डांगे तोंडावर आपटले आहेत. एखादा घाईत घेण्यात येणारा निर्णय किती अडचणीचा ठरू शकतो हे कराडकरांनी अतिक्रमण मोहीमेच्या वेळी पाहिलेले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी हा कर्फ्यू रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.

देशात कलम 144 लागू असल्याने फक्त अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत लागू असणारी संचारबंदीच कायम राहिल.  एखाद्या शहरात अथवा जिल्ह्यात संपूर्ण कर्फ्यू लागू करण्याचा अधिकार देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनाच असतो. तेच सल्लामसलत करून हा निर्णय घेत असतात. मात्र कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी याबाबत वरिष्ठांशी अथवा राज्याच्या प्रशासनाशी कोणतीही सल्लामसलत न करता चक्क ४८ तासांचा कर्फ्यू मनमानीपणाने जाहीर केला.

IMG-20200402-WA0006.jpg

यावर संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाल्यानंतर दक्षिण कराडकर ग्रुपचे अ‍ॅडमिन प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे मेलवर व प्रत्यक्ष फोन वरून कर्फ्यूबाबतची तक्रार केली. यानंतर जिल्हाधिकारी यांनी असा कर्फ्यू लागू करता येत नसल्याचे व तसा आदेश आपण मुख्याधिकारी डांगे यांना देत असल्याचे पाटील यांना कळविल्याने सीओंच्या कर्फ्यूची आयडीया त्यांच्यावरच उलटल्याची चर्चा दुपारनंतर शहरात सुरू झाली.

असा घाईगडगबडीचा निर्णय सीओ यांनी यापूर्वीही नगरसेवकांना विश्‍वासात न घेता मनमानीपणाने घेतल्याने अतिक्रमण मोहीमेवेळी दिसून आले. सीओ स्वतःला कलेक्टर समजतात अशी तक्रारही वेळोवेळी नगरसेवकांनी प्रत्यक्ष बोलून दाखवलेली आहे. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता