Wednesday, March 29, 2023

कोरोनावर चीनचा खळबळजनक खुलासा, १५४१ रुग्णांच्यात आढळले नाही एकही लक्षण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनने बुधवारी पहिल्यांदाच प्राणघातक कोरोनाव्हायरसच्या १,५४१ अशा घटना उघडकीस आणल्या आहेत ज्यामध्ये रुग्णांना या विषाणूची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. यामुळे देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन फेरी सुरू होण्याची चिंता वाढली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) मंगळवारी अचानक अशी घोषणा केली की ते संक्रमणाची चिन्हे न दर्शविणाऱ्या रुग्णांची माहिती जाहीर करतील.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने एनएचसीच्या हवाल्याने सांगितले की, सोमवारपर्यंत चीनने १,५४१ अशा रुग्णांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले होते, त्यामध्ये परदेशातील २०५ लोकांचा समावेश आहे.नॅशनल हेल्थ कमिशनचे प्रमुख चांग झिले म्हणाले की, चीन बुधवारपासून अशा रुग्णांची संख्या आणि त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती प्रकाशित करेल.एनएचसीच्या निवेदनात, कोविड -१९ मध्ये संक्रमित लक्षण-मुक्त रूग्णांमुळे हे संक्रमण अधिक पसरते.

- Advertisement -

दुसरीकडे, चीन कोरोना विषाणूच्या या जागतिक महामारीसंबंधी आपला डेटा अमेरिकेशी शेअर करेल आणि बीजिंगच्या अनुभवातून धडा घेण्यास या देशास मदत करेल. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी शी जीनपिंग यांच्याशी तब्बल एक तासाच्या चर्चेनंतर हे सांगितले.अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे कोविड १९ मुले झालेल्या मृत्यूची संख्या चीनपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ३,६०६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर चीनमध्ये ३,३०९ लोकांचा यात मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता