जरंडेश्वर प्रकरणी कुणीतरी तक्रार, स्टंट करून कारवाई होत असेल तर संशयास जागा : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर कारखान्यावर बुधवारी दि. 6 रोजी  किरीट सोमय्या यांनी भेट दिल्यानंतर लगेच 24 तासात आयकर विभागाची कारवाई सुरू झाली आहे. तेव्हा कुणीतरी तक्रार, स्टंट करत असेल आणि आयकर विभाग कारवाई करत असेल तर कारवाईवर संशय घेण्यास जागा असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आल्यानंतर लगेच जरंडेश्वर कारखान्यावर आयकर विभागाची कारवाई होते याच्यामध्ये संशय घेण्यास जागा आहे कोणीतरी स्टंट करताय म्हणून आयकर विभागा सारख्या मोठ्या विभागान कारवाई करणं हे योग्य नाही

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार येतात आणि लगेच आयकर विभागाची कारवाई होते. आजपर्यंत आयकर विभाग आला नाही, मात्र भाजपाच्या नेत्यांनी सांगितले की लगेच कारवाई करण्यास येतात. त्यामुळे जाणीवपूर्वक भाजपाच्या नेत्यांच्या येण्याने आयकर विभाग येणे यावर संशय घेण्यासाठी जागा आहे.

जे कारखानदार कुठल्याही प्रसंगाला जाण्यासाठी तयार असतात. कर नाही तर डर कशाला, त्यामुळे ज्यांनी स्वच्छ कारभार केलेले आहेत. याआधी कारवाईत काहीही निष्पन्न झाले नाही. ज्याच्या हातात यंत्रणा आहेत, त्यांचा ते नाहक वापर करत असतील. अधिकृतपणे आयकर विभागाला काय सापडले किंवा नाही हे लवकरच समोर येईल.

Leave a Comment