लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेला कुणाचा घाम फोडणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरांगे खडे तो सरकारसे बडे… होय आम्ही बोलतोय ती कोणती अतिशयोक्ती नाही तर महाराष्ट्र लोकसभेचं हे आहे जळजळीत वास्तव… जरांगे फॅक्टरनं मराठवाड्यासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला.. मराठवाड्यात तर औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांवर महायुतीला याच जरांगे पॅटर्नमुळे पाणी सोडावं लागलं… बीडला तर पंकजा मुंडे यांना सांगून पाडण्याचा कार्यक्रम जरांगेनी केला.. रावसाहेब दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर श्रुंगारे या मातब्बरांना पहिल्यांदाच मानहानिकारक पराभव याच जरांगे पाटलांमुळे बघायला मिळाला… लोकसभेच्या पहिल्या अंकातील किंगमेकर ठरल्यानंतर आता विधानसभेसाठी जरांगे २.० ची आता सुरुवात झालीय… मराठा आरक्षणाच्या मुदद्यावरुन पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभेचा प्लॅन एक्टिव्हेट केलाय… यात जरांगे पाटील कुणाला दणका देऊ शकतात? मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली काढतानाच मराठा मुख्यमंत्री बनवण्याइतपत त्यांची विधानसभेला ताकद लागेल का? जरांगे पाटलांचं हे २.० चं विधानसभेचं वर्जन नेमकं आहे तरी काय? तेच पाहुयात …..

मनोज जरांगे पाटील. या एकटया नावाने भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळवलं… मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी मुंबईच्या दारावर धडका मारुन सरकारच्या छातीत धडकी भरवण्याचा कार्यक्रम केला होता…मुख्यमंत्री शिंदेंनी तेव्हा प्रत्यक्ष भेटून आश्वासन दिलं.. आंदोलन शांत झालं.. पण ती पूर्ण न झाल्यानं जरांगेनी पुन्हा आंदोलनाचा बडगा उगारला… तेव्हा मात्र सरकारने जरांगेना अंगावर घ्यायला सुरुवात केली… जरांगे शरद पवारांच्या तोंडची भाषा बोलतात असं म्हणत त्यांनी जरांगेना निकालात काढायला सुरुवात केली… महायुतीचे सगळे नेते जरांगेंच्या आंदोलनावर संशय घेत त्यांच्या विरोधात स्टेटमेंट करू लागली…मराठवाड्यातील तर हा संघर्ष आणखीनच तीव्र झाला…

लोकसभेला निर्णायक ठरलेला जरांगे फॅक्टर विधानसभेला कुणाला घाम फोडणार? Maharashtra Vidhan Sabha 2024

पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या एका स्टेटमेंटने भडका उडाला…याचाच परिणाम म्हणून मराठा समाज लोकसभेच्या निवडणुकीत सरकारच्या विरोधात एकवटला…आणि महाविकास आघाडीच्या बाजूने जाऊन थांबला…अनेक विद्यमान मंत्र्यांसह अनेक दिग्गज, प्रस्थापित नेत्यांचं राजकारण या जरांगे फॅक्टरने शून्यात जाऊन पोहचलं… बीडमध्ये तर मुंडे घराण्याचं प्रस्थ मोडून काढत बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासारखा मराठा चेहरा खासदार झाला असेल तर त्यामागे मनोज जरांगेंचा मोठा वाटा असल्याचं स्वतः बजरंग बाप्पांनीही मान्य केलंय…लोकसभेचा हा रिझल्ट पाहता मराठा फेक्टर हा निर्णय ठरतोय, याचीच कल्पना जरांगे पाटलांनाही आली असावी, म्हणूनच त्यांनी आता जरांगे पाटील 2.0 या वर्जनला आता सुरुवात केलीय…

सत्तेच्या जोरावर आधी जाहीर केलेला सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने अडगळीत टाकला होता… मात्र लोकसभा निकालाचं हे परफेक्ट टाइमिंग साधत मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत…काहीही झालं तरी सगेसोयारे अध्यादेश मंजूर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही… असं म्हणून त्यांनी शिंदे फडणीसांना पुन्हा एकदा अडचणीत आणलय… आधीच लोकसभेच्या निकालातून तोंड बुक्क्यांचा मारा बसलेला असताना आता त्यात मनोज जरांगेंनी पुन्हा वातावरण तापवल्यानं याचे पडसाद विधानसभेवर पडतील का? हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही…विधानसभेच्या राजकारणात मात्र हे जरांगे 2.0 वर्जन मोठी उलथा पालथ घडवून आणेल…लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सक्रिय सहभाग घेतला नव्हता… मात्र विधानसभेला नाव घेऊन पाडणार, असं म्हणून जरांगे पाटलांनी सरकारला इशाराही दिलाय…

गरज पडली तर महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 288 जागा लढवू आणि जिंकू देखील, असं म्हणून त्यांनी अगदी तोंडावर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं सगळं डायमेन्शनच बदलून टाकलंय… देवेंद्र फडणवीसांबद्धल आमच्या मनात शत्रुत्व नाही… पण त्यांचं लक्ष हे फक्त फोडाफोडीत असतं…म्हणूनच त्यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला… असं स्टेटमेंट करून फडणवीसांना पुन्हा डॅमेज करायला सुरुवात केलीय…आमच्या उपोषणाला कोण कोण पाठिंबा देत नाही, त्या सर्व आमदारांवर आमचं लक्ष आहे. त्यामुळे, अशा आमदारांना गरीब मराठे कायमचं घरी पाठवणार आहेत… असं म्हणून जरांगे पाटलांनी विधानसभेचं पॉवर पॉलिटिक्स आत्तापासूनच खेळायला सुरुवात केली आहे.. लोकसभेतून पराभव झालेल्या महायुतीचा सूर यंदा मात्र जरांगेंच्या बाबतीत काही प्रमाणात नरमाईचा झाल्याचा दिसतय…

त्यामुळे भल्याभल्या मराठा पुढाऱ्यांना जे जमलं नाही त्या मराठा समाजाला एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न जरांगे पाटलांनी केला आहे…त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगे पाटील हे नाव राजकारण 360 अंशात फिरवतील… हे वेगळ्या भाषेत सांगायची गरज पडणार नाही… मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला यावेळेस तरी यश मिळेल का? विधानसभेला जरांगे पाटलांनी काय स्टॅन्ड घ्यावा? असं तुम्हाला वाटतं. तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,