हॅलो महाराष्ट ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil In Pune( यांची शांतता रॅली कोल्हापूर, साताऱ्याहून आज पुण्यात येणार आहे. जरांगेच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन करून मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीची सुरुवात होईल. पुणे हे तस महाराष्ट्रातील मोठं आणि गजबजलेलं शहर आहे, त्यामुळे जरांगे पाटलांच्या रॅली दरम्यान, पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
कशी असेल जरांगे पाटलांची रॅली –
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सारसबाग परिसरातून सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात होणार आहे. हि रॅली टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल, एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रोड, झाशीची राणी चौक मार्गे फेरी काढण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती संभाजी पुतळा येथे फेरी संपणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काही रस्ते बंद करण्यात आलेत तर काही ठिकाणी प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. जरांगे पाटील यांची रॅली समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा बंद झालेले रस्ते वाहतुकीसाठी खुले होतील.
हे रस्ते बंद –
गोखले स्मारक चौक ते नटराज चित्रपटगृह रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे.
काकासाहेब गाडगीळ पूल ते केळकर रस्ता वाहतुकीस बंद असणार आहे.
नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे.
टिळक चौक ते खंडोजीबाबा चौक वाहतूक बंद राहणार आहे.
नीलायम चित्रपटगृह ते सावरकर पुतळा चौक वाहतूक बंद राहणार आहे.
ना. सी. फडके चौक, सणस पुतळ्याकडे जाणारा मार्ग वाहतुकीस बंद असेल.
टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय ते पूरम चौक दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे.
पर्यायी रस्ते कोणते?
जेधे चौकातून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे, मित्रमंडळ चौक, सावरकर चौकमार्गे जाणार आहे.
सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांनी दांडेकर पूल, सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गावरून जावं. वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येईल.
कोंढवा खडीमशीन चौक – जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटमार्गे जातील.
कात्रज चौकमार्गे फेरी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे जाणार आहे.