..तोपर्यंत कोणताच शब्द देता येणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा तो दावा जरांगेंनी फेटाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष स्वातंत्र्य निवडणूक लढवेल हे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे, आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केल्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांचा हा दावा स्वतः मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी फेटाळून लावला आहे. “आम्ही येत्या 30 मार्चपर्यंत आमचा निर्णय जाहीर करू” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, “आम्ही मराठा समाजाबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही. सगळ्यांशी विचारविनीमय करून भूमिका घेऊ. मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आमच्याकडे 30 मार्चपर्यंत समाजाचा निरोप येईल त्यानंतर निर्णय जाहीर करू, तोपर्यंत कोणताच शब्द देता येणार नाही. सरकारनेच मला राजकारण शिकवलं आहे. सध्या तरी आम्ही महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराला अजून पाठिंबा दिलेला नाही”

दरम्यान, बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीसोबतची युती तुटली असल्याचे संकेत दिले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या आठ उमेदवारांची नावे जाहीर केली. यापूर्वी महाविकास आघाडीकडून वंचित आघाडीला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव वंचित आघाडीला मान्य नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये जागा वाटपावरून ताटातुटताना दिसत होती. अखेर आज वंचितने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवेल, हे स्पष्ट संकेत दिले.