कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
जयसिंगपूर येथील झेले कॉलनी मादनाईक मळा परिसरामध्ये सुरू असलेले तंबाखू प्रोसेसचे कारखाने बंद करावेत या मागणीसाठी या परिसरातील परिसरातील नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकारी कक्षामध्ये धडक मारली. संतप्त बनलेल्या नागरिकांनी तंबाखूची धस मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यअधिकारी मैत्रे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ते उपाय योजना केल्या जातील असे सांगितले. मोर्चेकऱ्यांनी तातडीने प्रोसेस बंद व्हावेत अशी मागणी लावून धरली पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोर्चेकरी पांगले. मुख्याधिकारी टीना गवळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस स्टेशन येथे जाऊन सागर मादनाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेच्या आवारात येऊन शासकीय कामात अडथळा आणला बाबत तक्रार दाखल केली आहे.
निवेदनामध्ये नागरी वस्तीतील तंबाखूचे प्रोसेस बंद करावे अशी मागणी करण्यात आली असून तंबाखू प्रोसेस मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे सध्या या परिसरामध्ये सात प्रोसेस असून त्यांना पालिकेने सुरु करण्यास परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे निवेदनावर सागर मादनाईक, प्रेमगीत पाटील ,मयूर आवटे, अक्षय मा द नाईक ,सुरेश रामपुरे आदींच्या सह्या आहेत.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
साई जन्मभूमीचा वाद आता उच्च न्यायालयात जाणार
रुक्मिणी मातेच्या ८ हजार साड्यांची अल्प दरात विक्री; साडी विक्रीतून मंदिर समितीला २० लाखांचे उत्पन्न