जावलीचा सुपुत्र, माझं कर्तव्य म्हणून तुमच्या भेटीला : तेजस शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जावली | दुर्गम कडेकपारीत दुर्गम जीवन जगणारी कष्टकरी जावलीच्या जनतेवर अतिवृष्टीने आसमानी संकट कोळलेल आहे. जावलीतील शेतकऱ्यांचे जीव वाहून जाऊन झाल्याने मन सुन्न झाल आहे. महाविकास आघाडी सरकारने व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला भरभरून मदत दिली आहे. जावलीचा सुपूत्र, माझं कर्तव्य म्हणून मी आज तुमच्या भेटीला आलो असल्याचे भावनिक अवाहन राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे यांनी भेटी दरम्यान केले.

राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष तेजस शिंदे यांनी जावलीत पाऊसाची संतताधार सुरु असताना देखील. पायी चालत मुकवली, भुतेघर, वाहीटे या गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची व नुकसानीची पाहणी केली. जावली तालुका आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी 40 जिवनाआवश्यक कीट तहसिलदार जावली यांच्या सुपूर्द केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवकचे सरचिटणीस गोरखनाथ नलावडे, बाजीराव धनावडे, बाबुराव शिर्के, शांताराम कासुरडे, दीपक मोरे, सचिन बिरामने, जगन्नाथ पार्टे, विठ्ठल पवार, दीपक पवार, संकेत पाटील, अतिष कदम, सुहास चव्हाण, अनिकेत बेलोशे, राजू सुतार, साहेबराव शेलार कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Comment