जयकुमार गोरेंना दणका : Supreme Court कडून वडूज न्यायालयात हजर होण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

मायणी येथील मागासवर्गीय मयत व्यक्तीची बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्याबाबत आ. जयकुमार गोरे यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोरे यांना वडूज येथील न्यायालयात तत्काळ हजर होण्याबाबत आदेश दिले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील मायणी येथील पिराजी विष्णू भिसे यांचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवून जमिनीचे बोगस दस्तऐवज तयार करण्यात आले होते. यामध्ये भिसे कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद नोंदवली. त्यानंतर त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बोगस दस्तऐवज फसवणूक प्रकरणी भिसे यांच्या नावाने सह्या करणाऱ्या संजय काटकरला पोलिसांनी याआधीच अटक केली. तसेच न्यायालयाने त्याला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, जयकुमार गोरे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वडूज येथील न्यायालयात सुनावणीची पार पडली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने या याप्रकरणी वडूज न्यायालयात गोरे यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment