Jayant Patil : अजितदादांपूर्वी जयंत पाटलांना होती उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर; राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी

Jayant Patil Offer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jayant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार याना हाताशी धरून सरकार चालवले असले तरी भाजपाची पहिली पसंत अजित पवार नवहे तर शरद पवारांचे एकनिष्ठ समजले जाणारे जयंत पाटील हेच होते. जयंत पाटील यांचे यांचे समर्थक पी. आर. पाटील यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मात्र त्यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेली आपली एकनिष्ठता पाळली आणि भाजपसोबत जाणे टाळले असं त्यांनी म्हंटल आहे.

शरद पवारांची साथ न सोडण्याचा निर्णय – Jayant Patil

पी. आर. पाटील म्हणाले, अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याच्या एक वर्ष आधीच जयंत पाटील याना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर होती. तुम्ही सोबत आल्यास माझ्या बरोबर उपमुख्यमंत्री होऊ शकता अशी ऑफर फडणवीस यांनी दिली होती. यानंतर जयंत पाटीलांनी आमच्याशी चर्चाही केली, मात्र कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून भाजपसोबत जायचं नाही असा निर्धार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यावेळीच केल्याचा दावा पी. आर. पाटील यांनी केला.

ज्या शरद पवार साहेबानी अजित पवार यांना आमदार, खासदार ते मंत्री केले, त्यांनाच अजित पवार सोडून गेले. मात्र, त्यांच्या अगोदरच जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असून सुद्धा ते भाजपमध्ये गेले नाहीत यावरून शरद पावर साहेब यांच्या बद्दलची असणारी त्यांची निष्ठा दिसून येते. असेही पी. आर. पाटील यांनी म्हंटल. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नेहमीच शरद पवारांवर निष्ठा ठेवली आणि यामुळे शरद पवारांचा वरदहस्त सुद्धा कायमच जयंत पाटलांवर राहिला असेही त्यांनी म्हंटल.