जयहिंद : कोल्हापूरच्या डाॅ. प्रकाश गुणे कुटुंबियांकडून सेनादलाला तब्बल 1 कोटीची देणगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर येथील प्रसिध्द डॉ. प्रकाश गुणे यांच्या कुटुंबियांची आपल्या उत्पन्नातील काही वाटा समाज, देशहितासाठी खर्च व्हावा, या त्यांच्या भावनेने व हेतूने डॉ. प्रकाश गुणे आणि कुटुंबियांनी भारतीय सेनादलाला तब्बल 1 कोटी रूपयाची देणगी दिली आहे. त्याबाबतचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः ट्विट करत आभार मानत काैतुकही केलेले आहे.

सशस्त्र सेनादल, युध्दग्रस्त पुनर्वसन फंडासाठी त्यांनी ही रक्कम देणगी स्वरूपात दिली आहे. नवीदिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे त्यांनी मदतीचा धनादेश सोपविला. डॉ. गुणे, हॉस्पिटल मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी अनुराधा गुणे, मुलगा डॉ. राहूल, नातू डॉ. आयर्न गुणे यांनी शुक्रवारी दुपारी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्याच्यासमवेत दिल्ली येथील मित्र डॉ. अमित शहा, अर्चना शहा उपस्थित होते. गुणे कुटुंब मुळचे गडहिग्लज येथील. डॉ. प्रकाश गुणे यांचे वडिल अनंत गुणे हे डॉक्टर होते. त्याचाच वैद्यकीय वारसा डॉ. प्रकाश गुणे व कुटुंब चालवित आहेत.

संरक्षण मंत्र्यांनी काय केले आहे ट्विट

डॉ.प्रकाश गुणे, त्यांची पत्नी श्रीमती अनुराधा गुणे आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) मधील कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्यासाठी ज्यांनी सशस्त्र सेना लढाई दुर्घटना कल्याण निधी (एएफबीसीडब्ल्यूएफ) मध्ये एक कोटी रुपयांचे उदार योगदान दिले आहे. डॉ.गुणे यांच्या कुटुंबाची आमच्या सशस्त्र दलाच्या जवानांच्या कुटुंबांना मदत करण्याची वचनबद्धता आणि उत्कटता खूप उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी आहे. माझ्या हृदयाच्या तळाशी असलेल्या या हावभावाबद्दल मी संपूर्ण गुणे कुटुंबाचे आभार मानतो. त्यांच्या योगदानाचे मनापासून कौतुक आहे.

Leave a Comment