“तारक मेहता का उल्टा चश्मा” मालिकेतून जेठालाल यांनी घेतला ब्रेक!! हे कारण आले उघडकीस

0
1
dilip joshi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी निराशा करणारी बातमी समोर आली आहे. तारक मेहतामधील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशींनी मालिकेमधून ब्रेक घेतला आहे. याबाबतची माहिती स्वतः दिलीप जोशी यांनी व्हिडिओ शेअर करून दिली आहे. त्यांनी दिलेले या बातमीमुळे त्यांच्या प्रेक्षकांना याचा मोठा धक्का बसला आहे. दिलीप मेहता यांनी ब्रेक घेतल्यामुळे आता पुढील काही दिवस या मालिकेमध्ये जेठालाल पाहिला मिळणार नाहीयेत. यामुळे तारक मेहता मालिकेचा TRP देखील कमी होऊ शकतो.

या कारणामुळे घेतला ब्रेक

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिलीप जोशी यांनी, आपण आपल्या सहकुटुंबासहित टांझानियाला धार्मिक सहलीला जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ते काही दिवस मालिकेत दिसणार नाहीयेत. त्यांनी फक्त या धार्मिक सहलीसाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. थोडक्यात त्यांनी तारक मेहता ही मालिका सोडलेली नाहीये. मात्र असे असले तरी, काही दिवसांसाठी जेठालाल दिसणार नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/reel/CwXBQIkMuyk/?igshid=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका TRP मध्ये टॉपला आहे. या मालिकेच्या व्यस्त शेडूल मध्ये कलाकारांना फारसा ब्रेक घेता येत नाही. मात्र यावेळी जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी व्यस्त शेडूलमधून ब्रेक घेतला आहे. या ब्रेकच्या दरम्यान ते एका धार्मिक प्रसंगी अबुधाबीलाही भेट देणार आहेत. तिकडून आल्यानंतर पुन्हा ते मालिकेत दिसणार आहेत. मात्र तोपर्यंत प्रेक्षकांना जेठालाल परत येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.