हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जग खूप पुढे गेलं आहे. आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा हवेत अडाणी बाईक किंवा हवेत उडणारी कार यांबाबत बातम्या वाचल्या असतील. परंतु स्वीडिश कंपनी Jetson ने ही संकल्पना सत्यात उतरून दाखवली आहे. कंपनीने आपली हवेत उडणारी कार Jetson One लाँच केली असून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे . आज आपण या अनोख्या कारचे फीचर्स आणि तिच्या किमतीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
लूक आणि डिझाईन –
या उडत्या इलेक्ट्रिक कारची लांबी 2840 मिमी, रुंदी 1500 मिमी आणि उंची 1030 मिमी आहे. कारचे वजन 86 किलोग्रॅम आहे. या कारचा लूक बघितला तर एखाद्या ड्रोन प्रमाणे आहे. तसे पाहिले तर हे एक इलेक्ट्रिक वर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग वाहन आहे. जे तुम्ही एका ठिकाणाहून टेक ऑफ करून हवेत उडू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने ते सुरक्षितपणे उतरवता येऊ शकते. हवेत उडणारी ही इलेक्ट्रिक कार चालवणे एकदम सोप्प आहे असं कंपनीचे म्हणणं आहे. काही वेळ प्रशिक्षण घेतल्यानंतर कोणीही अगदी सहजपणे ही कार उडवू शकेल अशीच तिची रचना केली असल्याचा कंपनीचा दावा आहे.
1500 फूट उंच भरारी घेणार –
हवेत उडणाऱ्या या कारमध्ये फक्त एकच व्यक्ती बसू शकतो. या कारमध्ये 88 KW क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. त्या जोरावर तब्बल 1500 फूट उंच भरारी घेऊ शकते. Jetson One 101 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडू शकते. या कारमध्ये काही खास सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत. इमर्जन्सी साठी यामध्ये बॅलेस्टिक पॅराशूटही देण्यात आले आहेत.
किंमत किती ?
कंपनीने या उडत्या इलेक्ट्रिक कारची किंमत $98,000 (जवळपास 80.19 लाख रुपये) ठेवली आहे. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून $8,000 (रु. 6.5 लाख) डाउन पेमेंट भरून ते घरी नेऊ शकतात. येत्या वर्षभरात या अनोख्या कारची डिलिव्हरी सुरु होईल. सध्या फक्त अमेरिकन बाजारात या उडत्या कारची विक्री सुरु आहे.