रत्नागिरी जिल्ह्यातल्या भगवती बंदरात क्रूज टर्मिनल उभारण्यासाठी 302 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यामध्ये गाळ काढणे, खोदकाम करणे, लाट रोधक भिंतीची उंची वाढवणे, टर्मिनल इमारत उभारणे, रस्ते वाहनतळ व फुटपाथ उभारणे, संरक्षक भिंत उभारणे, विद्युतीकरण सांडपाणी योजना, उद्यान, अग्निरोधक यंत्रणा उभारणे यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
निधीचे वाटप
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी राज्य सरकार 50%, केंद्र सरकार 50% निधी देणार आहे. राज्य सरकार 2024 -25 मध्ये एक कोटी, 2025- 26 मध्ये 70 कोटी आणि 2026- 27 मध्ये 80.81 कोटी असा 151 कोटी 81 लाख रुपयांचा निधी देणार आहे, तर केंद्र सरकार आहे तेवढाच वाटा उचलणार आहे. भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं मध्यवर्ती ठिकाण आहे.
इतर कामांचा समावेश
- मोरा तालुका उरण येथे रोरो जेट्टी बांधणे – 88.72 कोटी
- खारवाडीश्री इथे जेट्टी आणि अन्य सुविधा निर्माण करणे – 23.68 कोटी
- ठाणे येथे बांधकाम करणे 36.66 कोटी.
- मीरा-भाईंदर येथे जेट्टीचे बांधकाम 30 कोटी
- डोंबिवली येथे जेट्टी 24.99 कोटी
- काल्हेर इथे जेट्टी 27.72 कोटी.
- गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब जवळ जेट्टी उभारणी व अन्य कामे 229 कोटी.
- एलिफंटा इथे जेट्टी ची सुधारणासाठी 87.64 कोटी.
- उत्तम येथे रोरो जेट्टीचा बांधकाम 30.89 कोटी.
- असे एकूण 579 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.