झारखंड | झारखंड विधानसभेचा निकाल आज लागला. येथे झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने आघाडी घेतली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. तसेच, झारखंडच्या आदिवासी गरीब जनतेने भाजपला नाकरल्याची प्रतिक्रिया सोरेन यांनी दिली आहे.
2019 मध्ये भाजपने गमावलेलं झारखंड हे पाचवं राज्य आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या युतीने भाजपला मागे टाकलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र या राज्यांपाठोपाठ झारखंड राज्यही भाजपच्या हातातून निसटले आहे.
झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामुळे बहुमत गाठण्यासाठी ४१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. निकालाचे कल हाती आल्यानंतर भाजपा २६, तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४५ जागांंवर विजय मिळवला आहे. झारखंड मुक्ती मोर्चा ३०, काँग्रेस १४, तर राष्ट्रीय जनता दल ६ जागांवर विजयी झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून येणाऱ्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव
भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं – शरद पवार
झारखंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी