भारताच्या ‘या’ दिग्गज महिला क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा, लॉर्ड्सवर खेळणार अखेरचा सामना

Ladies T 20 Team
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील टी20 आणि वन डे सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला (Jhulan Goswami) स्थान देण्यात आलं आहे. पण 39 वर्षांच्या झुलनसाठी (Jhulan Goswami) हा दौरा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला शेवटचा दौरा ठरणार आहे. कारण झुलननं (Jhulan Goswami) 24 सप्टेंबरला होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले आहे.

झुलन गोस्वामीची कारकीर्द
झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पश्चिम बंगालच्या चकदामधून भारतीय संघात आलेली 5 फूट 11 इंच उंचीची झुलन (Jhulan Goswami) तेव्हा 19 वर्षांची होती. पण तेव्हापासून गेली दोन दशकं तिनं भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठं योगदान दिलं आहे. तिने आपल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत 12 कसोटी, 201 वन डे आणि 68 टी20 सामने खेळले आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम झुलनच्याच नावावर आहे. तिने वन डेत 252 तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 350 विकेट्स घेतल्या आहेत.

झुलनच्या (Jhulan Goswami) आजवरच्या कारकीर्दीवर बॉलिवूडमध्ये तिच्यावर बायोपिकदेखील येणार आहे . ‘चकदा एक्स्प्रेस’ नावाच्या या चित्रपटात अभिनेत्री आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हि झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 2023 साली प्रदर्शित होणार आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर