लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून संतप्त तरुणाने बंदुकीचा धाकावर कुटुंबाला धरले ओलीस आणि मग…

0
53
Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून संतप्त झालेल्या तरुणाने मुलीच्या नातेवाईकांना बंदुकीचा धाक दाखवत ओलीस ठेवले. हा सगळा प्रकार ओडिशातील बोलांगीर या ठिकाणी घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये ओडिशातील बोलंगीर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्याच एका नातेवाईकाने मुलीसाठी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारला त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने बंदुकीच्या धाकावर मुलीच्या कुटुंबाला ओलीस ठेवले.

काय आहे प्रकरण
आरोपी बिक्रम पांडा हा मुलीच्या घरात शिरला आणि त्यानंतर त्याने बंदूकीच्या धाकावर संपूर्ण कुटुंबाला बंधक बनवले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. जवळजवळ 5 तास हे प्रयत्न सुरु होते. 5 तसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना ओलीस ठेवलेल्या या कुटुंबाची सुरक्षित सुटका केली आणि आरोपीला अटक केली. पीडित कुटुंबाची भाची हॉस्पिटलमध्ये काम करते. तर आरोपी तरुण हा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या पीडित कुटुंबाच्या भाचीच्या प्रेमात होता. यानंतर या तरुणाने आपल्या लग्नाचा प्रस्ताव मुलीच्या कुटुंबीयांकडे दिला होता पण मुलीच्या कुटुंबीयांनी तो फेटाळला.

पीडित कुटुंबाने सांगितले की, आरोपी तरुणाने माझ्या डोक्यावर बंदूक रोखून धरली होती आणि भाचीला आणण्यास सांगितले. तेव्हा मी सांगितले ती आता घरी नाही आहे. तरीदेखील तो काहीच ऐकायला तयार नव्हता. यानंतर पोलिसांनी पीडित परिवाराची सुटका केल्यावर आरोपीने स्वत:ला एका खोलीत बंद केले आणि धमकी दिली माझ्या आसपास कुणी आले तर गोळी झाडेल. यानंतर पोलिसांनी 5 तसांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपीला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here