Jio, Airtel आणि Vi चा 666 रुपयांचा Recharge Plan झाला स्वस्त; मोजावे लागणार फक्त ‘इतकेच’ पैसे

Jio, Airtel Vi Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आकर्षक मोबाईल बाजारात दाखल झाले असले तरी त्याच्यामध्ये असलेल्या अनेक सिमकार्डच्या कंपन्यांनी आपले एक तसेच तीन महिन्याचे रिचार्ज प्लॅन स्वस्त केले आहेत. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे 666 रुपयांचा शानदार प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. Jio, Airtel आणि Vi च्या 666 रुपयांच्या प्लॅनची पाहूया काय वैशिष्ट्ये…

Jio च्या 666 रुपयांचा प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा 

Jio च्या 666 रुपयांचा प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा दिला जात आहेयाप्रमाणे एकूण कालावधीसाठी 126 GB डेटा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, डेटा आणि SMS चा लाभ घेता येऊ शकणार आहे. त्यामध्ये Paytm वापरकर्त्यांना SBI क्रेडिट कार्ड ऑफर करत आहे. त्यासोबतच ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक cashback मिळू शकतो.

Vi 666 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

Vi ने 666 रुपयांच्या रिचार्ज केल्यावर खास cashback ची ऑफर ठेवली आहे. या कंपनीच्या रिचार्जवर सुमारे 33 ते 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. Vodafone आणि एअरटेल वापरकर्त्यांसाठीही असाच रिचार्ज प्लॅन उपलब्ध असून Airtel हि 77 दिवसांच्या वैधतेसह 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे.

Airtel च्या 666 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळतोय ‘इतका’ डेटा

Airtel चा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने खास डेटाचा प्लॅन आणला आहे. एअरटेलच्या 666 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB पर्यंतचा डेटा मिळणार आहे. त्यासोबत 100 एसएमएसही देण्यात आले आहेत. एअरटेलचा 666 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन हा सर्वाधिक विक्री होणारा आहे.