हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओने (Reliance Jio) एलन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत एक महत्त्वाचा आणि मोठा करार केला आहे. यामुळे भारतात स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा (Starlink satellite internet constellation) पुरविण्यासाठी एक नवा मार्ग खुला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पेसएक्स (SpaceX) आणि जिओ (Jio) यांच्यातील हा करार ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करणार आहे. आणि लोकांना जलद सेवा देण्यास महत्वाची भूमिका बजावेल. यामुळे इंटरनेटमधील अडथळे दूर होणार आहेत. या कराराचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
ग्राहक सेवा सुरू करण्याची योजना –
या कराराचा ग्राहकांना मोठयाप्रमाणात फायदा होणार आहे. यामध्ये ग्राहकांना जिओच्या रिटेल आउटलेट्स आणि ऑनलाइन स्टोअरफ्रंटद्वारे स्टारलिंक सेवा आणि उपकरणे उपलब्ध होतील. यासोबतच , जिओ आपल्या फिजिकल स्टोअरमध्ये देखील स्टारलिंक उपकरणे आणणार असून ग्राहक सेवा सुरू करण्याची योजना आहे. स्पेसएक्सच्या सहाय्याने , जिओ आणि स्टारलिंक एकत्रितपणे भारताच्या डिजिटल इकोसिस्टममध्ये सहकार्याचे काम करणार आहेत.
करारामुळे परवडणाऱ्या इंटरनेट सेवांचा लाभ –
ग्राहकांना या करारामुळे जलद आणि परवडणाऱ्या इंटरनेट सेवांचा लाभ मिळेल, ज्यामुळे भारतातील उद्योग, लघु आणि मध्यम व्यवसाय आणि विविध समुदायांना अधिक प्रभावी इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. जिओचे JioAirFiber आणि JioFiber सेवा याला पूरक ठरतील. याआधी, एअरटेलने देखील स्पेसएक्ससोबत सहकार्याची घोषणा केली होती. या दोन कंपन्यांच्या भागीदारीमुळे भारतात स्टारलिंकचे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी एकत्र येतील. त्यामुळे, एलन मस्क यांच्या कंपनीने भारतात आपली उपस्थिती अधिक मजबूत केली आहे. नवीन करारामुळे भारतात सॅटेलाइट इंटरनेटचा विस्तार होईल, ज्याचा फायदा देशातील लाखो ग्राहकांना होईल.