Jio Cinema : अंबानींचा मास्टरस्ट्रोक; Jio सिनेमावर फ्री IPL दाखवून केली बक्कळ कमाई

Jio Cinema
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jio Cinema) आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे उद्योग विस्तारासाठी नेहमीच काही ना काही शक्कल लढवत असतात. ज्यामुळे विविध व्यवसाय क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा वाढतचं चालला आहे. सध्या देशभरात IPL सामान्यांचं वारं वाहतंय. अशातच, मुकेश अंबानींच्या Jio ने आयपीएल सामन्याचे मीडिया हक्क विकत घेतले आणि हे सामने विनामूल्य दाखवण्याचा निर्णय घेतला.

अंबानींच्या या निर्णयाने क्रिकेटप्रेमींचं तर मन जिंकलं आहे. यासोबतच अंबानींनी लढवलेली युक्ती मात्र फार कमी लोकांच्या लक्षात आली असेल. मुकेश अंबानी हे व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनच कायम निर्णय घेतात. यावेळी देखील त्यांनी अशीच काहीशी युक्ती लढवल्याचे समोर आले आहे. अधिक जाणून घेऊया.

Jio वर IPL मोफत दाखवण्यामागे अंबानींचा काय फायदा? (Jio Cinema)

मुकेश अंबानी यांनी Viacom18 मार्फत तब्बल ५ वर्षांसाठी IPL चे डिजिटल मीडिया अधिकार अधिकृतपणे विकत घेतले आहेत. एकूण २३,७५८ कोटी रुपये म्हणजे दरवर्षी ४७५० कोटी रुपये मोजून अंबानींनी हे अधिकार विकत घेतले आहेत. या अधिकारानेच अंबानी Jio च्या माध्यमातून IPL चे सामने मोफत दाखवत आहेत. आता जर तुम्ही असा विचार करत असाल की यामुळे अंबानींचा काय फायदा होणार आहे? उलट नुकसान झाले असेल.

तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की यावेळी तुम्ही पूर्ण चुकीचे आहात. (Jio Cinema) कारण मुकेश अंबानी यांनी दीर्घकालीन व्यवसाय लाभाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. IPL चे सामने आवडीने पाहणारा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे अंबानी फुकटात IPL दाखवून देखील करोडो रुपयांची कमाई करत आहेत. ती कशी? जाणून घेऊया.

मोफत IPL दाखवून कोट्यवधींची कमाई

अंबानींनी Jio सिनेमावर IPL चे सामने मोफत दाखवल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे अनेकांना वाटले असेल. पण मुळात मुकेश अंबानी यांनी घेतलेला हा निर्णय दीर्घकालीन व्यवसाय लाभाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे. ज्यामुळे अगदी मोफत सामने दाखवूनही अंबानी आरामात करोडो रुपये कमावत आहेत. एका वृत्तानुसार, Jio सिनेमावर (Jio Cinema) IPL चे सामने आणि त्या दरम्यान येणाऱ्या जाहिराती दाखवून अंबानी सहज ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करत आहेत.

दीर्घकालीन व्यावसायिक फायदा

Jio ने सामन्यांदरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींची किंमत फार कमी ठेवली आहे. ज्यामुळे त्यांच्याशी एकदा जोडला गेलेला जाहिरातदार हा दीर्घकाळ त्यांच्यासोबत टिकणार आहे. एकंदरच काय तर एक तीर आणि दोन निशाणे. गतवर्षी IPL च्या सामन्यांदरम्यान जिओ सिनेमाने (Jio Cinema) फक्त जाहिरातींमधून ३२३९ कोटी रुपये कमावले होते. मात्र यावेळी ते ४ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कमाई करू शकतात, असा अंदाज आहे. एका अहवालानुसार, यंदा IPL साठी सुमारे १८ प्रायोजक आणि २५० जाहिरातदार सामील आहेत. Dream11, Parle, Bitrania आणि HDFC बँक सारख्या मोठ्या ब्रँडचा यामध्ये समावेश आहे.

डाटा पॅकमधून कमाई

इतकेच नव्हे तर Jio या ब्रँड स्पॉटलाइट्समधूनसुद्धा कमाई करत आहे. शिवाय जिओ डेटाचा पूर्ण वापर करून पैसे कमावत. त्यामुळे सामना पाहण्यासाठी जिओ युजर्सला अधिक इंटरनेट खर्च करावा लागेल. ज्यामुळे जितका जास्त इंटरनेट खर्च टीका Jio चा फायदा. म्हणजे वापरकर्त्यांसाठी अधिक डेटाची आवश्यकता कंपनीला पैसे मिळवून देत आहे.

अंबानींचा मास्टरस्ट्रोक

मुकेश अंबानी कायम व्यवसाय वाढीच्या हेतूने निर्णय घेऊन सगळ्यांना थक्क करतात. यावेळी देखील त्यांनी मोफत ऑफरचा फंडा वापरून बिझनेस हिट करण्याचा नवा फॉर्म्युला हिट करून दाखवला आहे. सर्वात आधी (Jio Cinema) रिलायन्सने जिओ लाँच केले तेव्हा लोकांना मोफत डेटा आणि फ्री कॉलिंगच्या अमर्यादित ऑफर दिल्या होत्या. लोकांना आकर्षित ऑफर देऊन ग्राहक वाढवले आणि फक्त २ वर्षात जिओ टेलिकॉम क्षेत्रातील नंबर १ कंपनी झाली. यानंतर आता जिओ सिनेमावर IPL सामने मोफत दाखवून अंबानींनी आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे म्हणायला हरकत नाही. कारण यामधून भले सबस्क्रिप्शन फी मिळणार नाही पण दीर्घकालीन लाभ जरूर मिळतोय.