Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे, कसे ते जाणून घ्या

Jio Fiber Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio Fiber: सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने ग्राहकांसाठी नेहमीच अनेक आकर्षक प्लॅनच्या ऑफर्स दिल्या जातात. जिओकडून ग्राहकांना अनेक प्रकारचे मोबाइल प्रीपेड, पोस्टपेड प्लॅन ऑफर केले जातात. याच दरम्यान आता जिओने फायबरसाठी देखील प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन ऑफर केले आहेत. जिओ फायबरमुळे आता टीव्हीवर OTT एक्सेस मिळवणे देखील खूप सोपे झाले आहे. हे लक्षात घ्या कि, जिओ फायबरचे अनेक पोस्टपेड प्लॅन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये ग्राहकांना OTT बेनिफिट देखील मिळतात. Jio Fiber च्या 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 14 OTT Apps चा एक्सेस मिळतो. चला तर मग या प्लॅनच्या इतर फायद्यांबाबत जाणून घेऊयात …

JioFiber 699 रुपये वाला प्लान.

Jio Fiber च्या 699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 OTT Apps चे सब्सक्रिप्शन मिळते. मात्र इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यासाठी ग्राहकांना 200 रुपयांचे अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. ज्यानंतर, या प्लॅनची ​​किंमत 899 रुपये + टॅक्स अशी होईल.

How to Get JioFiber free with Installation for 1 Year? | DesiDime

100Mbps स्पीड

या Jio Fiber प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटासाठी 100Mbps चा स्पीड दिला जाईल, जो binge Watching आणि नेट सर्फिंगसाठी खूप उपयुक्त ठरेल. OTT मध्ये ग्राहकांना Disney + Hotstar, SonyLIV, Zee5, Voot Select, SunNXT, Hoichoi, Discovery +, Universal +, ALTBalaji, ErosNow, Lionsgate Play, ShemarooMe आणि Jio Cinema मध्ये एक्सेस दिला जाईल.

JioFiber Set Top Box now shipping with Android 9.0; JioCall and Zee5 added to offerings

लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा कस्टमर केअर टीमद्वारे या प्लॅनसाठी रिक्वेस्ट करणार्‍या नवीन ग्राहकांना दरमहा 3.3TB डेटाची ऑफर दिली जाईल. इथे हे लक्षात घ्या कि, या प्लॅनचे सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर ग्राहकांना Jio Fiber कडून फ्री सेट-टॉप बॉक्स मिळवण्यासाठी (STB) विनंती करता येईल. मात्र हे फक्त नवीन ग्राहकांसाठीच उपलब्ध असेल आणि ज्याची व्हॅलिडिटी 3, 6 आणि 12 महिन्यांची असेल.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.jio.com/selfcare/plans/fiber/fiber-prepaid-plans-home/

हे पण वाचा :
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो ??? कारण जाणून घ्या
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
Savings Account : मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर