हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडून ग्राहकांसाठी नेहमीच अनेक आकर्षक प्लॅन सादर केले जातात. आताही Jio ने भारतातील फुटबॉल प्रेमींसाठी ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ नावाने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा एक 4G डेटा व्हाउचर आहे. म्हणजेच या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे ऍक्टिव्ह बेस प्लॅन असावा लागेल.
हे जाणून घ्या कि, Jio च्या या नवीन डेटा व्हाउचर प्लॅनची किंमत 222 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना 30 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 50GB हायस्पीड डेटा मिळेल. हा एक डेटा अॅड-ऑन प्लॅन असल्यामुळे ऍक्टिव्ह प्लॅनचा डेटा संपल्यानंतरच ग्राहकांना या व्हाउचरचा डेटा वापरता येईल. या प्लॅनमध्ये 50GB पूर्णपणे वापरल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल.
खास फुटबॉलप्रेमींसाठी फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक
इथे हे लक्षात घ्या कि, खास फुटबॉलप्रेमींसाठी फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त 30 दिवसांसाठी व्हॅलिडीटी मिळेल. या प्लॅनद्वारे फुटबॉल चाहत्यांना JioCinema किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. मात्र कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हा प्लॅन किती दिवस उपलब्ध असेल याबाबतची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही. मात्र फिफा वर्ल्ड कपनंतर कंपनीकडून हा प्लॅन काढून टाकला जाण्याची शक्यता आहे.
जिओचा हा 222 रुपयांचा नवीन प्लॅन कंपनीची वेबसाइट आणि MyJio App वरून खरेदी करता येईल. Jio कडून 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले 181 रुपये, 241 रुपये आणि 301 रुपयांचे आणखी डेटा व्हाउचर देखील ऑफर केले जातात. यामध्ये अनुक्रमे 30GB, 40GB आणि 50GB डेटा देण्यात येतो आहे. याबरोबरच कंपनी फक्त 222 रुपयांमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत 50GB डेटा ऑफर करत आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home/
हे पण वाचा :
Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आजचे नवीन दर तपासा
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर