हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ पुन्हा एकदा ग्राहकांसाठी नवीन प्रीपेड प्लॅन बाजारात घेऊन आली आहे . हे प्लॅन यूजर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध आहेत, या प्लॅनची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जिओचे हे रिचार्ज प्लॅन वोडाफोन आयडिया तसेच एअरटेलला मोठी टक्कर देऊ शकतात, तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर कंपनीने लाँच केलेल्या या नव्या रिचार्ज प्लॅनचे सर्व डिटेल्स आज आपण जाणून घेउयात.
84 दिवसांच्या प्रीपेड प्लॅन –
जिओने आपल्या ग्राहकांसाठी 84 दिवसांच्या कालावधीचा प्रीपेड प्लॅन घेऊन आले आहे. हा प्लॅन 1028 आणि 1029 रु चा असणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2GB डेटाचा समावेश असणार आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा आणि अनलिमिटेड 5G ऑफर मिळणार आहे .तसेच अमेझॉन प्राईम मेंबरशिप मिळतेय.
1028 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –
जिओने 1028 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी दिली आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. यामुळे युजर्सला एकूण 168GB डेटा मिळणार असून , खास गोष्ट म्हणजे यात 5G डेटा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना या सेवा सोयीस्कर ठरतील.
1029 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –
याशिवाय 1029 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2GB डेली डेटा आहे. या प्लानचा कालावधी 84 दिवसांची असून , यात एकूण 168GB डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड 5G डेटा आणि अमेझॉन प्राईम मेंबरशिप उपलब्ध आहे. याचबरोबर , जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड यांचा सुद्धा वापर करता येतो. जिओ युजर्ससाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो .