Jio Pay SoundBox | आज-काल ऑनलाइन पेमेंटची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पेटीएम पेमेंट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. आपण दुकानांमध्ये बऱ्याच वेळा पेटीएमचे साऊंड बॉक्स पाहतो. ज्यामुळे तुम्ही पेमेंट केल्यानंतर दुकानदाराला आवाजावरून कळते की तुम्ही किती रुपये ट्रान्सफर केले आहेत. हे आता संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले आहे. अनेक लोक यूपीआयचाच वापर करत असतात परंतु आता यूपीआयच्या या स्पर्धेमध्ये जिओ देखील प्रवेश करणार आहे.
जिओ पेचे (Jio Pay SoundBox) एक ॲप बाजारामध्ये आधीच आलेले आहे. आणि आता यावर साउंड बॉक्सच्या मदतीने कंपनी आपला व्यवसाय वाढविण्याचा याचा विचार करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता जिओने साउंड बॉक्सची देखील चाचणी सुरू झालेली आहे. आणि लवकरच दुकानांमध्ये या जिओचा साऊंड बॉक्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आता मुकेश अंबानी यांनी पेटीएम, फोन पे, गुगल पे यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी हे नवीन ॲप लॉन्च केलेले आहे.
जिओची ही साउंड बॉक्सची ही चाचणी जर यशस्वी झाली आणि ती जर बाजारात आली तर इतर कंपन्यांसाठी ही थोडी चिंतेची गोष्ट आहे. खास करून पेटीएम पेमेंटसाठी ही एक धोक्याची घंटा असणार आहे.
काय आहे जिओचा नवीन नवा प्लॅन? | Jio Pay SoundBox
ही माहिती आतापर्यंत सोशल मीडियावर समोर आलेली आहे. परंतु जिओनी याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती दिलेली नाहीये. यामुळे आता विक्रेता आणि यूजर या दोघांना देखील खूप मोठा फायदा होणार आहे. ज्या युजर्सला स्मार्टफोन्स किंवा ॲप (Jio Pay SoundBox) वापरता येत नाही त्यांच्यासाठी देखील हे डिवाइस आता खूप उपयोगाचे ठरणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
जिओ पे साउंड बॉक्स लवकरच येणार बाजारात
जिओची कंपनी आता जिओ पे अँपसाठी (Jio Pay SoundBox) साउंड बॉक्स बाजारात आणण्याचे सिस्टीमवर काम करत आहे. या साउंड बॉक्सची चाचणी देखील आता चालली आहे. त्यामुळे इतर साउंड बॉक्सप्रमाणे ग्राहक याच्या मदतीने पेमेंट करू शकतो. हा बॉक्स देखील आवाजाद्वारे माहिती देणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या खात्यात किती पैसे शिल्लक राहिलेले आहे. त्याची देखील माहिती समजणार आहे. या साऊंड बॉक्सची खासियत म्हणजे ही साउंड बॉक्स म्युझिक सुविधा देखील उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे दुकानदार काम नसताना त्यांची आवडती गाणी देखील या साउंड बॉक्सवर ऐकू शकतात.