Jio Recharge Plan : Jio चा पैसावसूल रिचार्ज प्लॅन; महिना 160 रुपयांत 84 दिवस मजा

Jio Recharge Plan 448 rs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jio Recharge Plan। आजकाल मोबाईल रिचार्जच्या किमती खूप महाग झाल्या आहेत, परंतु गरजेची गोष्ट बनल्याने प्रत्येकाला मोबाईलला रिचार्ज तर करावा लागतच आहे. परंतु अशावेळी स्वस्तात मस्त आणि परवडणारा रिचार्ज करण्याकडे ग्राहकांचा कल असतो जेणेकरून खिशाला अधिक ताण पडणार नाही. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कमी खर्चात मोबाईल रिचार्ज करणार असेल आणि तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही अशा एका रिचार्ज प्लॅन बद्दल तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला ८४ दिवस तरी कसलं टेन्शन नाही… तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता, महत्वाचं म्हणजे ते सुद्धा अगदी कमी पैशात… आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगतोय तो आहे जिओ चा ४४८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ….. या रिचार्जच्या अंतर्गत तुम्हाला काय फायदे होतील ते आपण अगदी सविस्तर पाहूयात…..

तर मित्रानो, जिओच्या या ४४८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (Jio Recharge Plan) ग्राहकांना ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. म्हणजेच जर महिन्याचा हिशोब केला तर महिन्याला तुम्हाला फक्त १६० रुपयांचा खर्च पडू शकतो. या रिचार्ज प्लॅन मध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह १००० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. इतकेच नव्ह तर या रिचार्जसह तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड सर्व्हिसचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते, आणि क्लाउड स्टोरेजचा फायदा देखील देते. परंतु याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की ४४८ रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाचा समावेश नाही. म्हणजेच काय तर ज्या ग्राहकांना इंटरनेटची आवश्यकता आहे अशा ग्राहकांना मात्र हा प्लॅन काही कामाचा नाही…. उलट ज्या लोकांना फक्त कॉलिंग पुरता मोबाईल लागतो अशा ग्राहकांना मात्र हा रिचार्ज प्लॅन खूपच फायदेशीर आहे. काही यूजर्सना इंटरनेटची गरज नसते, त्यांना फक्त कॉलिंग साठी मोबाईल हवा असतो. अशा ग्राहकांच्या फायद्यासाठी आणि त्यांचे पैसे वाचवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र व्हॉइस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन लाँच करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिओने हा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.

Jio चा 1958 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – Jio Recharge Plan

४४८ सोबतच जिओने आणि १९५८ रुपयांचा रिचार्ज प्लॅनही ऑफर केला आहे. १९५८ रुपयांच्या रिचार्ज बद्दल सांगायच झाल्यास, या रिचार्ज प्लॅन अंतर्गत जिओ यूजर्सना ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह ३६०० मोफत एसएमएस आणि फ्री नॅशनल राष्ट्रीय रोमिंग मिळेल. याशिवाय, या प्लॅनच्या माध्यमातून जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही अ‍ॅप्सचा फ्री ऍक्सेस देखील उपलब्ध असेल.