हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी म्हणून Jio ओळखली जाते. ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे Jio चे लक्ष्य असते. त्यामुळे इतर कंपन्यांपेक्षा जिओकडे ग्राहकांचा जास्ती कल आपल्याला पाहायला मिळतो. आताही ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनीने 234 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून ग्राहक तब्बल 56 दिवस इंटरनेटसह सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकतात. परंतु हा प्लॅन Jio Bharat 4G या मोबाईल साठीच उपलब्ध राहील.
कोणकोणते लाभ मिळतात– Jio Recharge Plan
Jio Bharat च्या 234 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 28GB डेटा देण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दररोज 500MB इंटरनेट डेटा वापरता येईल. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय 300 एसएमएसची सुविधा 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. खास गोष्ट म्हणजे हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर २ महिने तुम्हाला रिचार्ज (Jio Recharge Plan) करावा लागणार नाही. याशिवाय ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनमध्ये JioSaavn आणि JioCinema चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.
दरम्यान, JioBharat फीचर फोनसाठी कंपनीने यापूर्वी 123 रुपये आणि 1234 रुपयांचे दोन रिचार्ज प्लॅन लाँच केले होते. यातील 123 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्याची वैधता 28 दिवस आहे. याशिवाय या प्लानमध्ये एकूण 14GB डेटा म्हणजेच दररोज 500MB डेटा उपलब्ध आहे. एवढच नव्हे तर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅन मध्ये JioSaavn आणि JioCinema चे सबस्क्रिप्शनही मोफत दिले जात आहे. तर दुसरीकडे 1234 रुपयांचा प्लॅन बद्दल सांगायचं झाल्यास, हा प्लॅन 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. यामध्येही ग्राहकांना दररोज 500MB इंटरनेट दिले जाते. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा 28 दिवसांसाठी मिळते. ग्राहक या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून JioSaavn आणि JioCinema चा लाभ घेऊ शकतात.