Jio Recharge Plan : Jio चा परवडणारा रिचार्ज प्लॅन; 458 रुपयांत 84 दिवस मजा

Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jio Recharge Plan। जिओ वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील हि आघाडीची टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. ग्राहकांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधांचा लाभ घेता यावा याकडे कंपनीचा कल असतो. आताही जिओने आपल्या यूजर्ससाठी २ नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅनच्या किमती अनुक्रमे ४५८ रुपये आणि १९५८ रुपये असून कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट केल्या आहेत. परंतु याठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा कि, या रिचार्ज प्लॅनचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांना इंटरनेटची गरज नाही आणि फक्त कॉलिंग आणि एसएमएस वापरतात.

काही यूजर्सना इंटरनेटची गरज नसते, त्यांना फक्त कॉलिंग साठी मोबाईल हवा असतो. अशा ग्राहकांच्या फायद्यासाठी आणि त्यांचे पैसे वाचवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र व्हॉइस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन लाँच करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिओने ४५८ रुपये आणि १९५८ रुपये असे २ प्लॅन लाँच केले आहेत. यातील ४५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि १००० मोफत एसएमएस मिळतील. याशिवाय, जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही सारख्या अ‍ॅप्सचा फ्री ऍक्सेस सुद्धा मिळेल. Jio Recharge Plan

1958 रुपयांचा रिचार्ज प्लॅन- Jio Recharge Plan

तर दुसरीकडे, १९५८ रुपयांच्या रिचार्ज बद्दल सांगायच झाल्यास, या रिचार्ज प्लॅन अंतर्गत जिओ यूजर्सना ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह ३६०० मोफत एसएमएस आणि फ्री नॅशनल राष्ट्रीय रोमिंग मिळेल. याशिवाय, या प्लॅनच्या माध्यमातून जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही अ‍ॅप्सचा फ्री ऍक्सेस देखील उपलब्ध असेल.

खरं तर आजकाल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये २ सिमकार्ड पाहायला मिळतात. यातील एकाचाच जास्त उपयोग होत असला तरी दोन्ही सिम कार्डला रिचार्ज मारणं आवश्यक असते, कारण रिचार्ज नाही मारला तर ते सिम बंद होण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत, यूजर्सच्या फायद्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि फक्त कॉलिंग आणि एसएमएससह रिचार्ज प्लॅन जारी करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिलेत. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील सुमारे ३० कोटी मोबाईल यूजर्सना याचा मोठा फायदा होतोय.