Jio Recharge Plan : Jio चा ग्राहकांना दणका!! बंद केला 1.5GB चा रिचार्ज

Jio Recharge Plan 799 rs
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jio Recharge Plan । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ ने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. जिओने आपला ७९९ रुपयांचा दिवसाला 1.5GB इंटरनेटचा रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवस होती. त्यामुळे ग्राहकांना तो परवडत होता, परंतु कंपनीने हा रिचार्ज प्लॅन बंद करत ग्राहकांना धक्का दिला आहे. आता जिओने 889 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1.5GB मिळेल खरं परंतु तुम्हाला ९० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. म्हणजेच काय तर ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसणार आहे.

जिओच्या ७९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (Jio Recharge Plan) ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस चा लाभ मिळत होता. तसेच जिओक्लाउड आणि जिओटीव्ही सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस देण्यात येत होता. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांसाठी होती आणि ग्राहकांना एकूण १२६ जीबी डेटा देण्यात येत होता. आता 889 रुपयांच्या नव्या रिचार्ज प्लॅन मध्येही याच सर्व सुविधा मिळतील, परंतु या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त जिओसावन प्रो सबस्क्रिप्शन मिळते.

२४९ रुपयांचा रिचार्ज सुद्धा बंद – Jio Recharge Plan

जिओने ग्राहकांना दिलेला आणखी एक धक्का म्हणजे २४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) सुद्धा बंद केला आहे. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी २८ दिवसांची होती ज्यामध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी ५जी डेटा मिळत होता. खरं तर हा कंपनीचा एकमेव १ जीबी डेटा प्लॅन होता ज्याची व्हॅलिडिटी २८ दिवस होती. परंतु आता कंपनीने या प्लॅनची किंमत २४९ रुपयांवरून २९९ रुपये केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. आधीच देशात महागाई वाढत आहे. त्यात मोबाईल रिचार्जच्या किमतीही सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडलं आहे. परंतु मोबाईल रिचार्ज हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनल्याने ग्राहकांना रिचार्ज केल्याशिवाय पर्यायच नाही, हि बाबही तितकीच खरी आहे. त्यातच भर म्हणजे एका रिपोर्टनुसार, एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या वर्षाच्या अखेरीस त्यांचे प्रीपेड आणि पोस्टपेड टॅरिफ आणखी १०-१२ टक्क्यांनी महाग करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास ग्राहकांना जगणं मुश्किल होईल.