हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jio Recharge Plan । देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio चे रिचार्ज प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत अगदी स्वस्त मानले जातात. कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा करून देण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. आताही जिओने ग्राहकांची मागणी पाहून एक नवा रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. जिओचा हा रिचार्ज प्लॅन तब्बल ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येतो. म्हणजेच काय तर एकदा रिचार्ज केल्यानंतर जवळपास वर्षभर तुम्हाला कटकट नाही.. सतत रिचार्ज करण्याची गरजही नाही. जिओचा हा रिचार्ज प्लॅन नेमकं किती रुपयांचा आहे? यात कोणकोणते बेनेफिट्स मिळतात ते आपण सविस्तर जाणून घेऊयात…
Jio चा 1748 रुपयांचा रिचार्ज प्लॅन- Jio Recharge Plan
आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगतोय तो आहे जिओचा 1748 रुपयांचा रिचार्ज प्लॅन.. या प्लॅन मध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ३,६०० मोफत एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे वापरकर्ते अनेक टीव्ही शो आणि चॅनेलचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, ५० जीबी जिओ एआय क्लाउड स्टोरेज देखील देण्यात आलं आहे. मात्र जिओच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये इंटरनेटची सुविधा नाही.. म्हणजेच काय तर हा रिचार्ज प्लॅन फक्त कॉलिंगची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. काही यूजर्सना इंटरनेटची गरज नसते, त्यांना फक्त कॉलिंग साठी मोबाईल हवा असतो. अशा ग्राहकांच्या फायद्यासाठी आणि त्यांचे पैसे वाचवण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वापरकर्त्यांसाठी स्वतंत्र व्हॉइस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन लाँच करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, जिओने हा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. Jio Recharge Plan
Jio चा 458 आणि 1958 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –
1748 सोबतच जिओने ४५८ रुपये आणि १९५८ रुपये असे २ प्लॅन सुद्धा लाँच केले आहेत. यातील ४५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि १००० मोफत एसएमएस मिळतील. याशिवाय, जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही सारख्या अॅप्सचा फ्री ऍक्सेस सुद्धा मिळेल. तर दुसरीकडे, १९५८ रुपयांच्या रिचार्ज बद्दल सांगायच झाल्यास, या रिचार्ज प्लॅन अंतर्गत जिओ यूजर्सना ३६५ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह ३६०० मोफत एसएमएस आणि फ्री नॅशनल राष्ट्रीय रोमिंग मिळेल. याशिवाय, या प्लॅनच्या माध्यमातून जिओ सिनेमा आणि जिओ टीव्ही अॅप्सचा फ्री ऍक्सेस देखील उपलब्ध असेल.