Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन; 730 GB डेटा, प्राइम व्हिडिओ आणि बरंच काही…

Jio Recharge Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio ने नवीन वर्षात आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक रिचार्ज प्लान आणला आहे. हा प्लान ऐकून तुम्ही खुश व्हाल. एका वर्षासाठी हा प्लान असला तरी वर्षभर तुम्हाला जास्त रक्कम खर्च करायची नाही. जिओच्या या प्लान मध्ये तुम्हाला 365 दिवसांकरीता 730 GB डेटा, कॉलिंग फ्री , प्राइम व्हिडिओ आणि जिओ सिनेमासह सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. चला तर पाहुया काय आहे जिओची योजना आणि त्याचा लाभ कसा घेऊ शकाल ते !

जिओ नेटवर्कने त्यांच्या ग्राहकांना स्वस्तात अनेक सोयी दिल्या आहेत. याबरोवर कंपनी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शनही देत आहे. या प्लॅनमध्ये 5G अमर्यादित डेटासुद्धा ग्राहकांना कमी किंमतीत उपलब्ध करून दिला आहे. जिओ नेटवर्कने नुकत्याच काही दीर्घकालीन योजना अपग्रेड केल्या आहेत, त्यापैकी ही स्वस्त आणि ग्राहकांना जास्त सुविधा देणारी योजना समजली जाते. कंपनीने 365 दिवसांच्या वैधतेसह अनेक प्लॅन ऑफर केले आहेत, ज्यात अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित 5G, मोफत SMS, Hotstar, Amazon Prime सारख्या लोकप्रिय OTT चे सदस्यत्वाचाही समावेश केला आहे. जिओ कंपनीने हा प्लान ग्राहकांना परवडणाऱ्या दरात लॉन्च केला आहे. याला आपण ‘व्हॅल्यू फॉर मनी प्रीपेड पॅक’ म्हणू शकतो.

जिओ कंपनीने Reliance Jio प्रीपेड पॅकमध्ये अनेक नवीन दीर्घ मुदतीच्या योजना आणल्या आहेत, या योजनांची वैधता 336 दिवस ते 365 दिवसांपर्यंत आहे. ही योजना विविध प्रकारचा लाभ देते. असाच एक प्लॅन 3227 रुपयांच्या किंमतीचा आहे. जिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा MyJio अॅपवर जाऊन हा प्लान तुम्ही पाहू शकता आणि तो ऍक्टिव्ह करू शकता. या प्लॅनमध्ये, ग्राहकाला 365 दिवसांची वैधता दिली असून दररोज 2 GB पेक्षा जास्त डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनसह एकूण डेटा लाभ 730 GB असा आहे. विशेष गोष्ट ही की, दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटची वेगमर्यादा 64kbps वर राहते.
हा वर्षभराकरिता अमर्यादित कॉलिंग प्लॅन आहे. ग्राहक एक वर्ष वैधतेपर्यंत अमर्यादित व्हॉइस कॉल करू शकेल. या कॉल्समध्ये STD आणि लोकल कॉलिंगचा समावेश आहे. OTT मनोरंजनासाठी प्लॅनमध्ये एक विशेष लाभ ग्राहकांना देण्यात आला आहे. यासोबतच जिओ कंपनी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लॅनमध्ये 5G अमर्यादित डेटा उपलब्ध आहे. Jio च्या नवीनतम प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या या पॅकमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसदेखील मिळण्याची सोय आहे.

याशिवाय, काही जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनदेखील या प्लानमध्ये मोफत देण्यात आले आहे. JioTV, JioCinema, JioCloud अॅप्सचे सबस्क्रिप्शन तुम्हाला या प्लानमध्येच मोफत देण्यात आले आहे. तुमच्या मोबाईलवर JioTV द्वारे, तुम्हाला प्लॅनची वैधता संपेपर्यंत अॅपवर विविध प्रकारचे टीव्ही शो पाहता येतील. Jio Cinema वरील नवीन चित्रपट पहा किंवा प्लॅनसह उपलब्ध JioCloud तुम्हाला अतिरिक्त स्टोरेज देते. परंतु जिओ कंपनीने Jio Premium चे सबस्क्रिप्शन समाविष्ट केलेले नाही. या प्लॅनबद्दल आणखी माहिती हवी असल्यास जिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.