हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रिलायन्स जिओने (Reliance Jio)नेहमीच आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार सेवा देण्यावर भर दिला आहे. आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. कमी किमतीत डेटा आणि टॉकटाइमचा लाभ देणारे हे प्लॅन्स ग्राहकांना फायदेशीर ठरणार आहेत. चला बघू मग हे प्लॅन्स कोणते आहेत.
100 रुपयांच्या आतील प्लॅन्स
जिओने 100 रुपयांच्या आत अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 81.75 रुपयांचा टॉकटाइम प्लॅन आहे. 69 रुपयांचा प्लॅन 6 GB हाय-स्पीड डेटासह येतो. 51 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 GB 4G डेटा तसेच मर्यादित कालावधीसाठी अनलिमिटेड 5G डेटा उपलब्ध आहे. 50 रुपयांचा प्लॅन 39.37 रुपयांच्या टॉकटाइमसह देण्यात येत आहे. 49 रुपयांचा प्लॅन 1 दिवसांसाठी 25 GB डेटा ऑफर करतो. 29 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 दिवसांसाठी 2 GB डेटा दिला जात आहे.
यासह , 20 रुपयांचा प्लॅन 14.95 रुपयांचा टॉकटाइम देत आहे, तर 19 रुपयांचा प्लॅन 1 दिवसासाठी 1 GB डेटा ऑफर देत आहे. 11 रुपयांचा प्लॅन फक्त 1 तासासाठी 10 GB हाय-स्पीड डेटा देतो, तर 10 रुपयांचा प्लॅन 7.47 रुपयांचा टॉकटाइमसह उपलब्ध आहे. जिओचे हे स्वस्त प्लॅन्स ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडीचा पर्याय देत आहेत.