हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय आणि आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने आपल्या ग्राहकांना धक्का देत मोबाईल तिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. कंपनीने ३ जुलै पासून हि दरवाढ केली आहे. त्यातच आता जिओने यासोबतच काही रिचार्ज प्लॅन काढून टाकले आहेत. त्यामुळे ग्राहकांना डबल झटका बसला आहे. हे रिचार्ज प्लॅन नेमके कोणते होते? आता ग्राहकांना कसा आर्थिक फटका बसेल हे आज आपण जाणून घेणार आहोत.
यातील पहिला रिचार्ज प्लॅन आहे तो म्हणजे जिओचा 2545 रुपयांचा प्लॅन… खरं तर हा रिचार्ज प्लॅन 336 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह येत होता, तसेच यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा वापरता येत होता. मात्र आता कंपनीने आपल्या लिस्ट मधून हा 2545 रुपयांचा प्लॅन हटवला आहे.
यानंतर दुसरा आहे तो म्हणजे जिओचा 2999 रुपयांचा मोबाईल रिचार्ज प्लॅन, कंपनीने हा प्लॅन हटवला नसला तरी याचं किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. 365 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या रिचार्ज प्लॅन मध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB इंटरनेटचा आनंद घेता येतो. मात्र आता याची किंमत 3599 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच काय तर ग्राहकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच 1559 रुपयांच्या प्लॅनऐवजी आता तुम्हाला 1899 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
याशिवाय Jio ने OTT सबस्क्रिप्शन प्लॅनही मोठ्या प्रमाणात काढून टाकले आहेत. यामध्ये 3,662 रुपयांचा प्लॅन , 3,226 रुपयांचा प्लॅन आणि 3,225 रुपयांचा प्लॅनचा समावेश आहे. या सर्व योजना OTT सबस्क्रिप्शनसह आल्या आहेत. तसेच, त्यांची वैधता 365 दिवस होती.