हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन ऑफर्स लाँच केल्या जातात. आताही जिओकडून एक खास प्लॅन ऑफर केला गेला आहे. ज्याअंतर्गत इंटरनेट डेटा, कॉलिंगसहीत OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन देखील देण्यात आले आहेत. 699 रुपये किंमत असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना इतर अनेक सुविधाही दिल्या जात आहेत. चला तर मग जिओच्या या नवीन प्लॅन बाबतची माहिती जाणून घेउयात…
Jio चा 699 रुपयांचा प्लॅन
हे लक्षात घ्या कि, जिओचा हा एक पोस्टपेड प्लॅन आहे. ज्याअंतर्गत 100 GB इंटरनेट डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि 100 SMS देखील मिळतील. यासोबतच ग्राहकांना ऍमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्सचे फ्री सब्स्क्रिप्शन देखील दिले जात आहे. तसेच जिओच्या या प्लॅनमध्ये प्लॅनमध्ये फ्री ट्रायलची सुविधा देखील मिळेल. म्हणजेच जर आपल्याला सर्व्हिस आवडली नाही तर आपण ती बंद करू शकाल. यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार नाहीत. याशिवाय यामध्ये तीन फॅमिली सिम देखील ऍड करता येतील. तसेच प्रत्येक एक सिम ऍड करण्यासाठी 99 रुपये द्यावे लागतील.
द्यावे लागणार सिक्योरिटी डिपॉझिट
मात्र, या फॅमिली प्लॅनसाठी ग्राहकांना 875 रुपये चार्ज द्यावा लागेल. तसेच जिओच्या फायबर युझर्सना, कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना,नॉन-जिओ पोस्टपेड युझर्सना, क्रेडिट कार्ड कस्टमर्स आणि चांगला क्रेडिट स्कोअर असल्यांना कोणतेही सिक्योरिटी डिपॉझिट द्यावे लागणार नाही.
जिओचा 399 रुपयांचा प्लॅन
Jio च्या हा एक फॅमिली पोस्टपेन प्लॅन आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. यासोबतच 75GB चा इंटरनेट डेटा देखील मिळेल. या प्लॅनमध्येही ग्राहकांना तीन फॅमिली मेम्बर्सना एड करता येईल. तसेच यामध्ये एक महिन्यासाठी फ्री ट्रायलची सुविधा मिळेल. याशिवाय सिक्योरिटी डिपॉझिट म्हणून 500 रुपये द्यावे लागतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/fiber/fiber-postpaid-plans-list/?category=Semi-Annual&categoryId=U2VtaS1Bbm51YWw=
हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…