टीम हॅलो महाराष्ट्र । जेएनयू हिंसाचाराबाबत आज सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रकार परिषद घेतली. व्हॉट्सअॅप ग्रुप आणि व्हायरल झालेल्या चॅटची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की त्या ग्रुपची सर्व संख्या तपासली पाहिजेत जेणेकरुन त्याची सत्यता कळू शकेल.
अभाविपच्या सरचिटणीस निधी त्रिपाठी म्हणाल्या की जेएनयू हिंसाचारावर चर्चा होत आहे पण ती फक्त ५ जानेवारीपर्यंतच मर्यादित आहे. पण हे पाहावे लागेल की हिंसाचार फक्त ५ जानेवारीला झाला नव्हता. २८ ऑक्टोबर २०१९ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत कॅम्पसमधील वाद काय होता हे पहावे लागेल.
Nidhi Tripathi, National General Secy, ABVP: Discussions are being held on #JNUViolence but it's restricted to 5 Jan only. It'll have to be seen that the violence is not confined to 5 Jan only, it'll have to be seen that what transpired on campus from 28 Oct 2019 to 5 Jan 2020. pic.twitter.com/FR2j4jZfU6
— ANI (@ANI) January 13, 2020
हे आंदोलन फक्त फीवाढी विरोधातलेच आंदोलन आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल असे निधी त्रिपाठी यांनी सांगितले. हा जेएनयूवर नक्षलवादी हल्ला होता. याची कथा २८ ऑक्टोबर २०१९ रोजी लिहिलेली होती, जी रक्तपात आणि मारहाणीच्या घटनेनंतर ५ जानेवारी २०२० रोजी हिंसाचाराच्या रुपात बाहेर आली होती.
५ जानेवारी रोजी संध्याकाळी जेएनयूमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. पेरियार वसतिगृह तोडण्यात आले. मुखवटा घातलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हॉकी स्टीक आणि लाठ्यांनी मारहाण केली. या घटनेत जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष हिला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर देश ढवळून निघाला. यानंतर संपूर्ण देशभरात हिंसाचाराविरोधात प्रदर्शने झाली.