हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या जे तरुण पुण्यामध्ये (Pune) नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. कारण, पुण्यातील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (ICAR) येथे नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत प्रकल्प सहाय्यक आणि वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) ही पदे भरली जाणार आहेत.
विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यामुळे योग्य शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या उमेदवारांना त्वरित संधी मिळू शकते. तसेच अधिक माहितीसाठी ही बातमी संपूर्ण वाचावी.
रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक आणि वरिष्ठ संशोधन फेलो (SRF)
रिक्त पदे – 02
नोकरीचे ठिकाण – पुणे
वेतनश्रेणी – 25,000/- ते 31,000/- प्रतिमहिना
निवड प्रक्रिया आणि मुलाखतीचा तपशील
निवड प्रक्रिया – थेट मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख – 19 मार्च 2025
मुलाखतीचा पत्ता –
ICAR – कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय,
पुणे – 410505, महाराष्ट्र
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे लागेल. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर वेळेत उपस्थित राहावे. तसेच, अधिक माहितीसाठी https://dogr.icar.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.
दरम्यान, सरकारी क्षेत्रात संशोधन संस्थेमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी ठरणार आहे.
तसेच, जे तरुण पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील ही भरती प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरू शकते.