हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Artificial Intellgence (AI) आणि ChatGPT च्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. परंतु Open AI नेच आपल्या कंपनीत तब्बल 3.6 कोटींच्या वार्षिक पॅकेजची नोकरी देणारी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना कोडींग, मशीन तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे त्या व्यक्तीसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. सध्या कंपनी योग्य उमेदवाराच्या शोधात असून त्यासंबंधीत मुलाखत प्रक्रिया सुरू केली आहे. ही माहिती Open AI कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
Open AI कंपनीनीकडून नुकतेच ChatGPT लॉन्च करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीचा व्याप वाढला असून इतर ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची गरज भासू लागली आहे. सध्या कंपनीला एका टॅलेंटेड व्यक्तीची गरज आहे जो कोडींगविषयी सर्व माहिती जाणून असेल. तसेच त्याला नवीन तंत्रज्ञानाची आणि त्याला हाताळण्याची देखील सवय असेल. कंपनीला जर योग्य उमेदवार मिळाला तर कंपनी त्या व्यक्तीस कोटींच्या घरात पगार देणार आहे. तसेच या व्यक्तीला कंपनीकडून इतर सोयी सुविधा देखील पुरवण्यात येतील. याबाबतची माहिती कंपनीनं तिच्या वेबसाईटवर दिली आहे.
कोणत्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू?
Open AI कंपनीत सध्या रिसर्च पदासाठी जागा रिकामी आहेत. त्यामुळे कंपनी अनेक रिसर्च इंजिनिअर, रिसर्च मॅनेजर, रिसर्च साइस्टिंटचा शोध घेत आहे. अशा उमेदवारांना रिसर्चची माहिती समजून घेणे, ती व्यवस्थित काढणे या गोष्टी जमल्या पाहिजे. अशा उमेदवारांना अनुभव आणि या संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. तसेच त्याला मशिन लर्निंगबाबत चांगले ज्ञान असावे. त्याचबरोबर उमेदवाराकडे क्रिएटिव्ह माईंड असणे आवश्यक आहे. सध्या अशा व्यक्तींच्या शोधात कंपनी आहे.
पगार किती असेल?
कंपनीला जरी योग्य उमेदवार मिळाला तर त्याच्या पात्रतेनुसार कंपनी त्याला पगार देईल. परंतु काही महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवाराला वार्षिक पॅकेज २४५००० अमेरिकन डॉलर म्हणजेच २ कोटी ते ३.७ कोटी देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तसेच त्याला एक्स्ट्रा अलाऊंसेंसही देण्यात येईल. परंतु उमेदवाराचे पॅकेज कंपनी मुलाखतीनंतर ठरवेल. सध्या Open AI कंपनीच्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात गेल्याचे म्हटले जात आहे. मात्र आता कंपनीलाच योग्य उमेदवारांची गरज भासू लागली आहे. या गरजेमुळेच Open AI कंपनीत वेगवेगळ्या पदांची भरती करण्यात येणार आहे.