मुंबई संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सामग्री अधिक्षक, मुंबईमध्ये विविध पदांसाठी तरुणांचे अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील या विभागामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर सविस्तर माहिती जाणून घेऊन त्वरित अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने पोस्टाने अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागणार आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? अर्ज नेमका कोठे पाठवावा लागेल? याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

कोणत्या पदासाठी भरती होणार?

सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत रजिस्ट्रार या एका पदासाठी भारतीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या एका पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. त्यामुळे जे उमेदवारी या पदावर काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आजपासून 60 दिवसांच्या आत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता काय हवी?

पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मास्टर पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय?

या पदासाठी वयोमर्यादा ही 56 वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.

अर्ज कोठे पाठवावा?

मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी, संरक्षण मंत्रालय, कक्ष क्रमांक 33, काश्मीर हाऊस, राजाजी मार्ग, नवी दिल्ली- 110011 या पत्त्यावर पाठवावा.

  • अधिक माहितीसाठी https://www.mod.gov.in/ या वेबसाईटला भेट द्यावी.
  • इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी अर्ज आजपासून 60 दिवसांच्या आत करावा.