NTPC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! पात्रता आणि अटी लगेच जाणून घ्या…

NTPC
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती (Job Requirement) प्रक्रिया सुरू होत आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 4 फेब्रुवारी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, NTPC च्या अधिकृत वेबसाइटवर (ntpc.co.in) या भरतीची माहिती देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया २१ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ फेब्रुवारी २०२५ आहे. या भरतीत ८ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा.

पात्रता आणि अटी:

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
  • उमेदवारांकडे कामाचा अनुभव असणेही अनिवार्य आहे.
  • उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव, आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

१. NTPC च्या अधिकृत वेबसाइट careers.ntpc.co.in ला भेट द्या.

२. “सीनियर एक्झिक्युटिव्ह भरती २०२५” या लिंकवर क्लिक करा.

३. आवश्यक माहिती भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

४. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

५. अर्जाची प्रिंटआउट कॉपी स्वतःकडे ठेवा.

दरम्यान, या भरतीसंदर्भातील सर्व तपशील, अर्ज प्रक्रिया, आणि पात्रतेबाबतची अधिक माहिती लवकरच एनटीपीसीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NTPC ची वेबसाइट नक्की पहावी.