मराठी पाट्यांवरुन शिवसेना-एमआयएममध्ये जुंपली

औरंगाबाद – ज्या सरकारने सर्व पाट्या मराठीतून असाव्यात असा निर्णय घेतला आहे. यावरून शिवसेना, मनसे, एमआयएममध्ये जुंपली असून, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार निधीतून मराठी पाटील आणण्यासाठी पुढाकार घेण्याचा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

शिवसेना मनसेमध्ये पाट्यांचे श्रेय घेण्यासाठी जोरदार स्पर्धा लागली आहे. त्यात एमआयएमने देखील उडी घेत, सरकारने पाट्या मराठीतून करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर शिवसेनेचे खासदार निधी वापरण्याचा सल्ला दिला आहे. शहरात मनसेने मराठी पाट्या असणाऱ्या दुकानदारांना गौरवपत्र देऊन सन्मान करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात शिवसेनेने देखील जुन्या स्टाइलने आक्रमक पणे दुकानदारांना मराठीतून पाठवा लावण्याची तंबी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषेचे जतन करून तिच्या संवर्धनासाठी व मुलांवर बालवयातच भाषेचा संस्कार व्हावा या उद्देशाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने दुकानदारांनी स्वतःहून अंमलबजावणी करावी; नसता मराठीतून पाट्या लावण्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजु वैद्य यांनी दिला आहे.

भाषेच्या संवर्धनासाठी भाषेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. शिवसेनेने सुरुवातीपासून मराठी भाषेतून पाट्या लावण्याची मागणी केलेली आहे. मराठी भाषा संवर्धन विभागाने दुकानांना मराठीतूनच पाट्या लावण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीतून पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता दुकानदारांनी पुढाकार घ्यावा मराठीतून पाट्या लावण्याचे कारवाई करावी; नसता शिवसेना आक्रमक होऊन दुकानांवरील पाट्या मराठीतून लावण्याची मोहीम हाती घेईल, असे राजु वैद्य यांनी म्हटले आहे.