कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दख्खनचा राजा जोतीबाची यात्रा रद्द करण्यात आलीय. करोनाच्या संकटामुळे जोतिबाची यात्रा रद्द झाल्याने डोंगराकडे जाणारे रस्ते ओस पडले आहेत. डोंगर सुनसान आहे . ठराविक पुजाऱ्यानी आज जोतीबाची अलंकारिक पूजा बांधलीय. लाखो भाविकांच्या उपस्थियीत संपन्न होणारी यात्रा कोरोनाच्या संकटामुळं मात्र १२१ वर्षानंतर रद्द झालीय.
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध प्रदेशामधून भाविक येतात. यात्रेपूर्वी जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची महिनाभर अगोदर तयारी सुरू असते. यंदा मंगळवारी होणारी यात्रा रद्द झाली आहे. प्रशासनाला करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या बैठका घ्याव्या लागत आहेत. आज कोल्हापुरात पंचगंगा नदीचा परिसर शांत आहे. गुलालाने दरवर्षी न्हाऊन जाणारा डोंगरावरील मंदिराचा परिसर भाविक नसल्याने शांत झाला आहे. ओवऱ्या सुनासुन्या झाल्या आहेत. करोनाच्या संकटामुळे भाविकांना यंदा घरातूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. घरातूनच कपाळाला गुलाल लावून ‘चांगभलं’ची भावना व्यक्त करावी लागणार आहे. करोनाचे संकट दूर झाल्यावर पुढच्या वर्षी पुन्हा जोतिबा डोंगर यात्रेकरुंच्या गर्दीने फुलून जावे अशी भावना लाखो भाविकांची असणार आहे.
आज करोनामुळे डोंगराकडे जाणारे सारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. पंचक्रोशीतील गावात संचारबंदी करण्यात आली आहे. यंदा एकही भाविक आणि सासनकाठी डोंगरावर जाणार नाही यासाठी पोलिस प्रशासन दक्ष आहे. यात्राकाळात शेकडो गावातून भाविक डोंगरावर येतात. आता डोंगरावरील पूजेचे साहित्य, खाद्यपदार्थ, खेळण्याची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यात्रा काळात पुजाऱ्यांच्या घरात सुरू असलेली धांदल ही थंडावली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी
मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर