साताऱ्यात पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

फलटण येथील पत्रकार सुमित चोरमले यास साताऱ्यात येऊन एक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या प्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच संबंधित गुंडावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांना देण्यात आले.

यावेळी या निवेदनाची तात्काळ दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी संबधित संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा शहर पोलीस स्टेशनला दिले आहेत. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांवर यापुढे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून आरेरावी किंवा धमकावण्याचे प्रकार झाल्यास त्या प्रवृत्तीला ठेचून काढल्या शिवाय सातारा जिल्हा पत्रकार संघ शांत राहणार नाही, असा इशारा सातारा जिल्हा पत्रकार जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सचिव दीपक प्रभावळकर यांनी या वेळी बोलताना दिला आहे.

यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सदस्य सुजित आंबेकर, मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया अध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष नलावडे, प्रशांत जगताप, सचिन बर्गे, चंद्रकांत पवार यांच्यासह सातारा शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

Leave a Comment