मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला काँग्रेसच रोखू शकतं- पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदींची वाटचाल ही हुकूमशाही कडे असून या वाटचालीला फक्त काँग्रेस च रोखू शकत अस त्यांनी म्हंटल. ते नाशिक येथे बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झाले आहेत. देशाची वाटचाल ही हुकूमशाही कडे चालली आहे. आणि मोदींची ही हुकूमशाही काँग्रेसच रोखू शकते.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे असे सांगितले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. मात्र मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढेल अस ते म्हणाले.