कराड | काल मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आगाशिव डोंगरवर दोघे मित्र व्यायामासाठी गेले होते. त्यांना परत येण्यास उशीर झाला. अंधाऱ्या रात्रीत ते दोघेही रस्ता भरकटले. रात्री 10 वाजेता त्यांनी मदतीसाठी फोनाफोनी केली. यावेळी सदरचा प्रकार पत्रकार सुभाष देशमुखे कळवत मदतीची विनंती केली. तेव्हा श्री. देशमुखे यांनी मित्रांसोबत शोधमोहिम राबविली अन् दोघांनाही सुरक्षित घरी पोहचवले.
आगाशिव डोंगरावर येथील मुसा लियाकत मुल्ला (वय- 42, रा. कापील, ता. कराड) आणि सचिन चंद्रकांत विंचू (रा. आगाशिवनगर)हे डोंगरात गेले होते. रात्री रस्ता चुकल्याने पत्रकार सुभाष देशमुखे आणि त्याचे मित्र उद्योजक अजित सांडगे, अमोल पाटील, इस्माईल मुलाणी, आण्णा माळी, अभिजीत काैले हे वेळेत पोहचले. मग रात्रीच्या भयंकर अंधारातून ते पठाराजवळ गेले. तेथे अडकलेल्या दोघांचा शोध घेऊन त्यांना खाली सुरक्षित आणले. या मित्रांच्या कार्याचा गाैरव कराड पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
कराड शहर पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेचे अधिकारी चैतन्य कणसे, पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे दादासाहेब शिंगण, सागर बर्गे, माजी नगरसेवक महादेव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.